Pimpri News : मावळ भाजपची कार्यकारिणी जाहीर

Pimpri News : मावळ भाजपची कार्यकारिणी जाहीर
Published on
Updated on

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : मावळ तालुका भारतीय जनता पार्टीची नूतन कार्यकारिणी व विविध आघाड्यांच्या अध्यक्षांची निवड सोमवार (दि. 27) झालेल्या पत्रकार परिषदेत जाहीर करण्यात आली. यामध्ये प्रामुख्याने युवा मोर्चाच्या तालुकाध्यक्षपदी नितीन मराठे यांची, तर महिला मोर्चाच्या तालुकाध्यक्षपदी सायली बोत्रे यांची फेरनियुक्ती करण्यात आली.

माजी मंत्री संजय (बाळा) भेगडे, मावळ विधानसभा मतदारसंघ निवडणूक प्रमुख रवींद्र भेगडे, प्रभारी भास्करराव म्हाळसकर, माजी सभापती गुलाबराव म्हाळसकर, रामदास गाडे यांच्या उपस्थितीत तालुकाध्यक्ष भाऊसाहेब गुंड यांनी पक्षाची नूतन कार्यकारिणी व सर्व आघाड्यांच्या अध्यक्षांची निवड जाहीर केली. नूतन कार्यकारिणीमध्ये 1 कोषाध्यक्ष 6 सरचिटणीस, 16 उपाध्यक्ष, 14 चिटणीस, 22 कार्यकारिणी सदस्य असे एकूण 59 नूतन पदाधिकार्‍यांचा समावेश असून, वेगवेगळ्या 19 आघाड्यांसाठी स्वतंत्र अध्यक्षांचीही निवड या वेळी करण्यात आली.

कार्यकारिणीमध्ये प्रामुख्याने आंदर मावळ, नाणे मावळ, पवन मावळ अशा सर्व ग्रामीण भागातील पक्षाच्या निष्ठावंत व क्रियाशील कार्यकर्त्यांना तसेच नवीन कार्यकर्त्यांना संधी देण्यात आली असल्याचे तालुकाध्यक्ष भाऊसाहेब गुंड यांनी सांगितले.
निवृत्ती शेटे, भास्करराव म्हाळसकर, राजाराम शिंदे कोअर कमिटीचे प्रमुख, मावळ तालुका भाजपच्या ज्येष्ठ पदाधिकार्‍यांचा समावेश असलेल्या कोअर कमिटीच्या अध्यक्षपदी निवृत्ती शेटे यांची नियुक्ती करण्यात आली असून भास्करराव म्हाळसकर यांच्याकडे पुन्हा प्रभारीपदाची जबाबदारी देण्यात आली, तर राजाराम शिंदे यांची कार्याध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली असल्याचे माजी मंत्री भेगडे यांनी सांगितले.

चिटणीस – चंद्रकात गाडे, संतोष काळे, संदीप भूतडा, अरुण कुटे, रामदास आलम, वैशाली घारे, ज्योती काटकर, संभाजी कोंडे, सुरेश आलम, अनंता कुडे, संजय वाजे, रविंद्र तळावडे, संदीप लालगुडे, बंडू कदम
कार्यकारिणी सदस्य – रामभाऊ गोपाळे, निलेश मराठे, गणेश देशमुख, निलेश नाणेकर, किसन येवले, शत्रुघ्न धनवे, शिवाजी ढोले, संतोष ठुले, अनिल साबळे, नितीन गाऊडसे, गोविंद दरेकर, मुरली कुटे, संदेश शेलार, प्रवीण मुर्‍हे, शेखर दळवी, तानाजी शिंदे, इंदाराम उंडे, रविंद्र आंद्रे, संतोष मोकाशी, दिनेश कचरे, दिलीप वावरे, अशोक शेलार.

नितीन मराठे (अध्यक्ष युवा मोर्चा), रवी शेटे (कार्यध्यक्ष युवा मोर्चा), सायली बोत्रे (अध्यक्ष महिला मोर्चा), सारिका पडवळ (युवती आघाडी), अभिजित नाटक (अध्यक्ष विद्यार्थी मोर्चा), सूर्यकांत सोरटे (अध्यक्ष किसान मोर्चा), विकास शेलार (कार्याध्यक्ष किसान मोर्चा) ज्ञानेश्वर आडकर (अध्यक्ष सहकार आघाडी), शरद साळुंखे (अध्यक्ष ओबीसी आघाडी), दीपक भालेराव (अध्यक्ष अनुसूचित जाती), गणेश धानिवले (अध्यक्ष अनुसूचित जमाती), भूषण मुथा (अध्यक्ष व्यापारी आघाडी), प्रणेश नेवाळे (अध्यक्ष युवा वॉरियर्स), अरविंद बालगुडे (अध्यक्ष क्रीडा आघाडी), सुनील वरघडे (अध्यक्ष अध्यात्मिक आघाडी), सचिन काजळे (अध्यक्ष सरपंच आघाडी), चेतन मानकर (अध्यक्ष पंचायतराज आघाडी), निलेश अग्रवाल (अध्यक्ष लीगल सेल आघाडी), बिपिन बाफना (अध्यक्ष जनप्रकोष्ट), दत्तात्रय खेंगले (अध्यक्ष कामगार आघाडी). मनोहर भेगडे (अध्यक्ष इंदोरी – सोमाटणे गट)

पक्ष देईल तो आदेश पाळणार : बाळा भेगडे

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी मावळ मतदारसंघावर भाजप दावा करणार का, तसेच लोकसभा निवडणूक लढवणार का, यासंदर्भात बोलताना माजी मंत्री भेगडे यांनी राज्यात महायुतीचे सरकार असून महायुती जो निर्णय घेईल व पक्ष जो आदेश देईल तो पाळला जाईल, असे सांगून पक्षाने लोकसभा प्रवास योजनेची दिलेली जबाबदारीही प्रामाणिकपणे पूर्ण करत असल्याचे सांगितले. आतापर्यंत 24 लोकसभा मतदासंघातील दौराही पूर्ण झाला असल्याचे भेगडे यांनी सांगितले.

मावळ भाजप आता इलेक्शन मोडवर : रवींद्र भेगडे

महिन्यापूर्वी पक्षाच्या तालुकाध्यक्षपदाची निवड जाहीर केल्यानंतर सोमवारी तालुका कार्यकारिणीची निवड करून मावळ भाजप आता इलेक्शन मोडवर आला असल्याचा दावा रवींद्र भेगडे यांनी केला. आगामी काळात होणार्‍या लोकसभा व विधानसभा या निवडणुका भारतीय जनता पार्टी पूर्ण ताकदीने लढणार असून त्यादृष्टीने नूतन पदाधिकारी कार्यरत राहतील, असा विश्वास व्यक्त केला.

नूतन कार्यकारिणी पुढीलप्रमाणे :

कोषाध्यक्ष – सुधाकर ढोरे, उपाध्यक्ष – नितीन घोट्कुले, सचिन येवले, अभिमन्यू शिंदे, राणीताई म्हाळसकर, रोहिदास असवले, अविनाश गराडे.सरचिटणीस – राजेंद्र मुर्‍हे, वसंत म्हसकर, एकनाथ पोटफोडे, मधुकर पडवळ, अशोक ठुले, अमोल धिडे, संजना सातकर, रामदास लालगुडे, गणेश ठाकर, गणेश कल्हाटकर, विठ्ठल घारे, काळूराम पवार, शशिकांत शिंदे, प्रसाद हुलावळे, सुभाष देशमुख, देवराम गायकवाड.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news