Pimpri News : असोसिएशन करणार वकिलांच्या मागण्यांचा पाठपुरावा | पुढारी

Pimpri News : असोसिएशन करणार वकिलांच्या मागण्यांचा पाठपुरावा

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : पिंपरी येथील नेहरूनगरमधील दिवाणी व फौजदारी न्यायालयातील पिंपरी-चिंचवड अ‍ॅडव्होकेट बार असोसिएशनच्या निर्वाचित कार्यकारिणीने शनिवार (दि. 25) दैनिक ‘पुढारी’च्या कार्यालयास भेट दिली. या वेळी असोसिएशनच्या वतीने वकिलांच्या मागण्यांचा पाठपुरावा करणार असल्याचे मत अध्यक्ष रामराजे भोसले यांनी व्यक्त केले. या वेळी उपाध्यक्ष प्रतीक्षा खिलारी, सचिव धनंजय कोकणे, महिला सचिव मोनिका सचवानी, सह सचिव उमेश खंदारे, हिशेब तपासणीस संदीप तापकीर, सदस्य अस्मिता पिंगळे आदी उपस्थित होते.

असोसिएशनची 1700 हून अधिक सदस्यसंख्या असून, ही महाराष्ट्रातील सर्वात मोठी असोसिएशन आहे. तरीही अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय, वरिष्ठ न्यायालय शहरात नसल्याने नागरिकांसह वकिलांनाही याचा फटका सहन करावा लागत आहे. परिणामी पुणे शहरात हेलपाटे मारावे लागत असल्याची खंत कार्यकारिणीकडून व्यक्त करण्यात आली; तसेच शासनाने न्यायालयाच्या निश्चित केलेल्या जागेचे काम केव्हा सुरू होणार. न्यायालयाला स्वतःच्या हक्काची इमारत केव्हा मिळेल. याविषयांवर या वेळी चर्चा झाली. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय, वरिष्ठ न्यायालय आणि मोशी येथील नवीन ईमारतीचे काम या मागण्यांसाठी पाठपुरावा करणार असल्याचे मत नव्या कार्यकारिणीने व्यक्त केले.

दैनिक ‘पुढारी’शी पूर्वीपासून आमचे नाते आहे. वेळोवेळी बातम्यांच्या माध्यमातून आमच्या समस्या मांडल्या जातात. कार्यालयास भेट दिल्यानंतर झालेल्या सकारात्मक चर्चेत आमचे प्रश्न ऐकून घेतले. त्याबाबत ‘पुढारी’चे आभार.

– अ‍ॅड. रामराजे भोसले,
अध्यक्ष पिंपरी-चिंचवड अ‍ॅड. बार असो, पिंपरी.

पाठीवर कौतुकाची थाप पडल्यावर कामाचा उत्साह वाढतो. ही थाप दैनिक पुढारीने आमच्या कार्यकारिणीस दिल्याने आमचा आत्मविश्वास वाढला आहे. नागरिकांसाठी आणि वकिलांच्या समस्या सोडविण्यासाठी आम्ही कार्यरत राहू.

– अ‍ॅड. प्रतीक्षा खिलारी,
उपाध्यक्ष पिं. चिं. अ‍ॅड. बार असो, पिंपरी.

आम्ही नागरिकांच्या समस्या ऐकून घेतो. मात्र आमच्याही काही समस्या आहेत. त्या आपल्या दैनिक पुढारीने ऐकून घेतल्या. त्यावर सकारात्मक चर्चा करण्यात आली. आपल्या दैनिकामधून न्यायालयाच्या बातम्यांना प्रसिध्दी दिली जाते. वकिलांच्या समस्यांना देखील आपल्या दैनिकाद्वारे वाचा फोडली जाते.

– अ‍ॅड. धनंजय कोकणे, सचिव
पिं. चिं. अ‍ॅड. बार असो.पिंपरी.

असोसिएशनच्या वतीने वकिलांच्या समस्यांचा पाठपुरावा केला जाणार आहे. दैनिक पुढारीने आमच्या समस्या जाणून घेतल्या त्याबाबत आभार.

– अ‍ॅड. अस्मिता पिंगळे, पिं. चि. अ‍ॅड. बार. असो, पिंपरी.

संघटनेच्या वतीने वकिलांचे प्रश्न सोडविण्यासाठी पूर्ण प्रयत्न केले जातील. तसेच सेशन आणि सीनिअर कोर्टासाठी आमची संघटना पाठपुरावा करणार आहे.

– अ‍ॅड. संदीप तापकीर, हिशेब तपासनीस, पिं. चिं. अ‍ॅड. बार असो, पिंपरी.

हेही वाचा

अमरावती : डोक्यावर प्रहार करून सराफ व्यावसायिकाची हत्या; तिवसा येथील घटना

Pune : अवकाळी पावसाने ऊसतोड मजुरांचे हाल

Kasturi Club : तिमिरातूनी तेजाकडे; मंगलमय वातावरणात उजळले दीप

Back to top button