Pune Metro : मेट्रो स्थानकाचा जिना ठरतोय अडथळा | पुढारी

Pune Metro : मेट्रो स्थानकाचा जिना ठरतोय अडथळा

येरवडा : पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन (महामेट्रो) मेट्रोचे रुबी हॉल हॉस्पिटलपर्यंत काम पूर्ण झाले आहे. या मार्गावर मेट्रो सुरू झाली आहे. यातील पुढील टप्पा रुबी हॉल ते रामवाडी आहे. येरवडा येथील मेट्रो स्टेशनसाठी बनविण्यात आलेला जिना हा पादचारी मार्ग सोडून बाहेर 5 फूट रस्त्यावर आला आहे.
यामुळे मुख्य रस्ता अरुंद झाला आहे. याचा स्थानिक नगरसेवक आणि स्थानिक नागरिकांनी विरोध करीत काम थांबवले होते. या मार्गावरील काम लवकरात लवकर व्हावे यासाठी गुरुवारी मेट्रो अधिकारी, महापालिका अधिकारी आणि स्थानिक नगरसेवक यांनी पाहणी केली. या वेळी महामेट्रोचे मुख्य प्रकल्प व्यवस्थापक अमोल मोहोळकर, उप व्यवस्थापक मयांक गुप्ता, वरिष्ठ वास्तूविशारद शुभदा मोरे, माजी नगरसेवक  अविनाश साळवी, अश्विनी लांडगे  उपस्थित होते.
येरवडा येथील मेट्रोचा जिना रहदारीसाठी अडथळा ठरत असल्याने स्थानिक नागरिकांनी हे काम थांबवले आहे. गुरुवारी महापालिका आणि मेट्रोच्या अधिका-यांनी पाहणी केली आहे. लवकरच याबाबत चर्चा करून निर्णय घेण्यात येईल.
– अमोल मोहोळकर, मुख्य प्रकल्प व्यवस्थापक, महामेट्रो
हेही वाचा

Back to top button