

पुणे : महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त फुले वाड्याला दिलेल्या भेटीप्रसंगी पत्रकार परीषदेदरम्यान प्रकाश आंबेडकर यांनी अनेक मुद्दांवर आपले मत व्यक्त केले. ते म्हणाले की महात्मा फुले यांनी जो लढा दिला होता. त्याची फळे आपण चाखतो आहोत. सामाजिक, धार्मिक स्वतंत्र मिळालं. आज देशात हिंदू असूनही देशात, पुन्हा वैदिक परंपरा सुरू कराव्या आशा मागणी होत आहे. आरएसएस किंवा विश्व हिंदू परिषद यांनी जरी म्हटले नसले तरी फडणवीस यांनी जे वक्तव्य केलं की 'संविधान बदलणार नाही' पण आरएसएसचे प्रमुख मोहन भागवत हे जोपर्यंत असे वक्तव्य करत नाही तोवर आम्ही मान्य करणार नाही.
अनेक ठिकाणी दंगलग्रस्त परिस्थिती आहे, प्रत्येक पोलीस स्टेशनला सतर्क करण्यात आले आहे, कुठल्याही परिस्थितीत ६ डिसेंबरनंतर काहीही घडू शकतं पण हे चार राज्याच्या निवडणूका झाल्यानंतर घडेल असे ही प्रकाश आंबेडकर म्हणाले. युध्दाबाबत पंतप्रधान वेगळी भूमिका घेतात तर दुसरीकडे परराष्ट्रमंत्री वेगळी भूमिका घेतांना दिसतात.
मुस्लिम आणि ओबीसी आरक्षण टार्गेट केलं जातंय. हे मात्र नक्की. तीन दिवसापूर्वी मुस्लिम संघटना बैठक मुंबईमध्ये झाली.
८ डिसेंबरला मुस्लिम संघटना पॅलेस्टाईन विषय आझाद मैदानावर सभा घेणार आहेत. आम्ही त्याच्या सोबत आहोत. असेही प्रकाश आंबेडकर म्हणाले. आंतरराष्ट्रीय प्रश्नावर सामान्य माणसाने विचार करायला हवा, भाजपा हे मुस्लिम विषय आहे म्हणून सोडून द्या अस सांगत आहे.
मला आता परत सांगायची गरज नाही, मंडलबाबत इतिहास पहा कळेल, भुजबळ यांना जेल मधून बाहेर काढणारा मीच आहे. उलटा वार न्यायालयात मीच केला. त्यानी कधी आभार मानले नाहो. मला कोणाची गरज नाही. जरा इतिहास सुधारून घ्या मग कळेल, लढा ओबीसीचा जनक मी आहे. मी बोलेल कधीच मागे घेत नाही मागे घेणार नाही. तसेच ते म्हटले की जरांगे पटलांनी आमचं म्हणणं ऐकलं जरांगे पाटलांच स्वागत आहे.
हेही वाचा