महाराष्ट्रातील निर्णयासाठी नेत्यांना करावी लागते दिल्लीवारी : खासदार सुप्रिया सुळे | पुढारी

महाराष्ट्रातील निर्णयासाठी नेत्यांना करावी लागते दिल्लीवारी : खासदार सुप्रिया सुळे

भोर : पुढारी वृत्तसेवा :  राज्यातील ट्रिपल इंजिन खोके सरकारमधील नेत्यांना सरपंचपदापासून ते पालकमंत्रिपदाचा निर्णय घेण्यासाठी दिल्लीवारी करावी लागते, अशी टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी केली. भोलावडे (ता. भोर) येथील कार्यकर्ता मेळावा व नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच, सदस्य यांच्या सत्कार समारंभ प्रसंगी खासदार सुळे बोलत होत्या. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शेवाळे, तालुकाध्यक्ष रवींद्र बांदल, वंदना धुमाळ, विक्रम खुटवड, युवक अध्यक्ष गणेश खुटवड, शहराध्यक्ष यशवंत डाळ, नितीन धारणे, महादेव कोंढरे, विद्या यादव, राजू खोपडे, विठ्ठल शिंदे, रोहिदास जेधे, संदीप नांगरे, गणेश निगडे, माऊली खुटवड, सरपंच प्रवीण जगदाळे, उपसरपंच अविनाश आवाळे आदींसह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

संबंधित बातम्या :

खा. सुळे पुढे म्हणाल्या की, राज्यात 288 आमदारांपैकी 200 आमदार सत्तेत असूनही मराठा, धनगर, लिंगायत, मुस्लिम या समाजांचे आरक्षणाचे प्रश्न सोडविता येत नसल्याने त्यांच्याविरोधात आंदोलन, रास्ता रोको, उपोषण, जाळपोळ या घटनांचे प्रमाण वाढू लागले आहे. याकडे त्यांचे दुर्लक्ष होत असताना जनतेच्या विकासाचा मुद्दा बाजूला ठेवून आपापसात भांडणे करून महाराष्ट्राला अस्थिर करण्याचे पाप करणारे सरकार सत्तेसाठी लाचार झालेले आहे.भोर तालुक्यातील राष्ट्रवादीच्या (शरद पवार गट) पुढील पदाधिकार्‍यांना निवडीची पत्रे या वेळी देण्यात आली. भरत रघुनाथ बांदल (उपाध्यक्ष), कुणाल साळवी (अध्यक्ष, अभियंता सेल), भिकोबा कुमार (अध्यक्ष, ज्येष्ठ नागरिक सेल), अंकुश धायगुडे (जिल्हा उपाध्यक्ष), सदाशिव कंक, संजय बोडके, रवींद्र पांगुळ, नवनाथ राजीवडे आणि ज्ञानोबा तुकाराम कुडले (सरचिटणीस), सुभाष राजाराम दिघे (युवक उपाध्यक्ष)

Back to top button