अजित पवार राजकीयदृष्ट्या अतिशय चतुर : चंद्रकांत पाटील | पुढारी

अजित पवार राजकीयदृष्ट्या अतिशय चतुर : चंद्रकांत पाटील

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  राज्यात मराठा आरक्षणावरून राजकीय वातावरण तापले आहे. राज्य सरकारने जरांगे पाटील यांना आरक्षण देण्याविषयी लेखी आश्वासन दिले. त्यानंतरच त्यांनी उपोषण मागे घेतले आहे. आता मराठा आरक्षणाचा प्रश्न तीन टप्प्यांत सुटेल, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. ते बुधवारी पुण्यातील सर्वपक्षीय ‘वाडेश्वर कट्टा’ कार्यक्रमाला हजेरी लावली. त्या वेळी ते माध्यमांशी बोलत होते. राज्यातील मराठा समाजातील लोकांच्या कुणबी नोंदी शोधण्याचे काम सुरू आहे. तसेच ज्यांच्या कुणबी नोंदी आढळल्या आहेत, अशा लोकांना जात प्रमाणपत्र देण्याचे काम सरकारकडून केले जात आहे.

राज्यात तीन कोटी लोकसंख्या असलेला मराठा समाज आणि साडेतीन कोटी लोकसंख्या असलेला ओबीसी समाज आहे. अशा सात कोटी समाजाच्या सर्वसामान्य माणसांच्या मनामध्ये एकमेकांबद्दल तिरस्कार निर्माण होत आहे. तसे होणार नाही, याची आपण सर्वांनी काळजी घेतली पाहिजे, असे पाटील म्हणाले. अजित पवार दिवाळी स्नेहभोजनासाठी गोविंदबागेत शरद पवारांच्या घरी गेले. त्याविषयी माध्यमांनी विचारले असता, चंद्रकांत पाटील म्हणाले, अजित पवार राजकीयदृष्ट्या अतिशिय चतुर, चलाख आणि धूर्त आहेत. ’ते पोटात काय आहे ते ओठावर येऊ देत नाहीत’, असे वक्तव्य केले आहे.

हेही वाचा :

Back to top button