Pune News : आमचं पवारांशी नातं कौटुंबिक : आमदार अतुल बेनके | पुढारी

Pune News : आमचं पवारांशी नातं कौटुंबिक : आमदार अतुल बेनके

बारामती : पुढारी वृत्तसेवा : दरवर्षी दिवाळी पाडव्याला बारामतीत यायचं हा गेल्या अनेक वर्षातील शिरस्ता आहे. आमचे नाते राजकीय नसून ते कौटुंबिक आहे. राष्ट्रवादी एकसंघ राहावा ही आमची अपेक्षा असल्याचे मत जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांनी व्यक्त केले.
आमदार अतुल बेनके यांनी येथील गोविंदबागेत ज्येष्ठ नेते शरद पवार यांची दिवाळी पाडव्याला भेट घेतली. यावेळी ते म्हणाले, माझे वडील वल्लभशेठ बेनके दरवर्षी दिवाळी पाडव्याला पवार, खासदार सुळे यांना भेटायला यायचे.
मी ही गेली अनेक वर्षे येत आहे. यातून कोणताही राजकीय अर्थ काढण्याची आवश्यकता नाही. राजकारणापेक्षा आमचे नाते कौटुंबिक आहे. पक्ष एकसंघ राहावा ही माझ्यासह अनेकांची भावना आहे. भविष्यात तो एकसंघ राहिल. मी माझी राजकीय भूमिका पहिल्याच दिवशी स्पष्ट केली असून त्यावर मी ठाम आहे. मी जुन्नरकरांच्या कामासाठी कटीबद्ध आहे. माझे कार्यकर्ते व जनता यांच्याशी बोलून मी राजकीय निर्णय घेईल.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गोविंदबागेत यावे असे मला वाटते. भविष्यात ते ही घडू शकते असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. शिवाय बारामतीत आता सहयोग सोसायटीतील निवासस्थानी जात अजित पवार यांनाही भेटणार असल्याचे ते म्हणाले. तुम्ही व आमदार अशोक पवार हे दोघेच गोविंदबागेत आले. इतर आमदार का आले नाहीत यावर त्यांनी भाष्य करणे टाळले. परंतु पुढील काही दिवसात पक्ष एकसंघ राहिलेला दिसेल याचा त्यांनी पुनरुच्चार केला.
हेही वाचा

Back to top button