Crime News : गुंतवणुकीच्या आमिषाने पाच कोटींचा गंडा | पुढारी

Crime News : गुंतवणुकीच्या आमिषाने पाच कोटींचा गंडा

पुणे : पुढारी वृत्तसेवा : व्यावसायिकाला फॉरेक्स ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे सांगून त्याचा विश्वास संपादन करून गुंतवणूक रकमेवर दरमहा 10 ते 14 टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवून तब्बल 5 कोटी 12 लाख दहा हजार रुपयांची आर्थिक फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी दिलीप गोविंद नाईक (रा. मुकुंदनगर) यांनी सहकारनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

त्यानुसार, बिबवेवाडी येथील सिझन व्लर्डस कंपनीचे मालक योगेश कदम, तेथील स्टाफ तुषार मोरे, विशाल हळदणकर, दिग्विजय सिंग, अभिषेक यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे कंपनीत पैसे गुंतविल्यास रकमेवर अल्पावधीत चांगल्या प्रकारे परतावा मिळेल, असे आमिष आरोपींनी दिलीप नाईक यांना दाखवले.

त्यानंतर तक्रारदार यांना आंतरराष्ट्रीय करन्सी ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक करण्यास प्रवृत्त करून वेळोवेळी 2 कोटी 20 लाख रुपये घेऊन दरमहा परतावा देण्यात येईल, असे सांगितले. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक एस. वैरागकर करत आहेत.

हेही वाचा

Back to top button