Pimpri News : मावळात भात कापणीला यंत्राची जोड

Pimpri News : मावळात भात कापणीला यंत्राची जोड
तळेगाव दाभाडे : मावळ तालुक्यात खरीप भातपिकाची कापणी जोरात सुरू आहे. गावोगावी एकाचवेळी कापणी सुरू असल्याने मजूर मिळत नाहीत. त्यामुळे शेतकरीबांधवांचा आता यंत्राच्या सहाय्याने भात कापणी करण्याकडे कल असल्याचे दिसत आहे. 13, 500 हेक्टरवर भातपीक तालुका हा खरीप भातपिकाचे आगार आहे. तालुक्यात सर्वांत जास्त भातपीक घेतले जाते. यावर्षी सुमारे 13 हजार 500 हेक्टर क्षेत्रावर खरीप भातपीक घेण्यात आलेले आहे, असे मावळ तालुका कृषी अधिकारी दत्तात्रय पडवळ यांनी सांगितले.
एकाच वेळी संपूर्ण तालुक्यातील सर्व गावांमध्ये भातपीक कापणी सुरू झाली आहे. त्यामुळे भात कापणी करण्यासाठी लागणारे मजूर मिळत नाहीत. परिणामी शेतकर्‍यांसमोर मोठे संकट निर्माण झाले आहे. मजुरांच्या तुटवड्यामुळे मजुरीचे दरही भडकले आहेत. सध्या मजुरीचे दर हे प्रतिदिन 300 ते 400 रुपये एवढे वाढले आहेत. अखेर नाईलाजाने शेतकर्‍यांना जास्त मजुरी देऊन त्यांना कामासाठी घ्यावे  लागते आहे.
जास्त मजुरी देऊनही मजूर मिळत नसल्यामुळे अखेर शेतकरी हे आधुनिक यंत्रांद्वारे भातपीक कापणीकडे वळू लागले आहेत. छोटे भात कापणी यंत्राचा दर ताशी 1500 ते 2000 रुपयांपर्यंत आहे. एका तासात हे यंत्र एक एकर भात कापणी करते.
– महेश कुडले, 
भात उत्पादक शेतकरी
भात कापणी यंत्राचा दर मात्र दर तासाला 4500 ते 5000 रुपये आहे. या यंत्राच्या सहाय्याने एका तासात 2 ते 3 एकर भातपीक कापणी होते. तालुक्यात खरीप भातपिकाची कापणी आतापर्यंत 40 टक्क्यांपर्यत झाली आहे.
– विकास गोसावी, कृषी सहायक अधिकारी, मावळ तालुका 
हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news