Pune Crime News : हडपसर पोलिस ठाण्यासमोर कारमध्ये मृतदेह

Crime
Crime

पुणे : पुढारी वृत्तसेवा : हडपसर पोलिस ठाण्यासमोर लावण्यात आलेल्या अपघातग्रस्त पार्क केलेल्या कारमध्ये एका व्यक्तीचा मृतदेह आढळण्याची घटना सोमवारी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. त्या व्यक्तीला ससून रुग्णालयातील डॉक्टरांनी देखील मृत घोषित केले. सतीश प्रभू कांबळे (वय 45) असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे.

सोमवारी 4 वाजता हडपसर पोलिस स्टेशनच्या समोरील बि—जच्या बाजूला लावण्यात आलेल्या एका जुन्या वॅगनार गाडीमध्ये मागील सीटवर बेवारस पुरुष (अंदाजे वय 45 ते 46 वर्ष) आढळला. अमित सतीश कांबळे, (20 वर्ष, रा. महात्मा फुले वसाहत, आमिर चिकन शेजारी, हडपसर) याने सदर व्यक्ती वडील सतीश प्रभू कांबळे,( वय 45 ) असल्याचे सांगितले. त्यांना दारूचे व्यसन असून, त्यांच्या डोक्यावर परिणाम झाला असल्याने ते सतत घर सोडून निघून जात असतात.

दि. 15 ऑक्टोबरला घर सोडून गेलेले होते व अद्यापपर्यंत घरी आले नव्हते. त्याचवेळी अमितची आई सुरेखा सतीश कांबळे (वय 36 वर्षे ) याही या ठिकाणी आल्या. पोलिस उपनिरीक्षक खळदे व पोलिस हवालदार सकट यांनी खाजगी अ‍ॅम्बुलन्समधून सदर व्यक्तीला ससूनमध्ये पाठवले. तेथील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केल्याचे हडपसर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेळके यांनी सांगितले.

टास्क फ्रॉडद्वारे तरुणाला बारा लाखांचा गंडा

पार्ट टाईम नोकरीचे आमिष दाखवून टास्क फ—ॉडद्वारे एका तरुणाला सायबर चोरट्यांनी 12 लाख 40 हजारांचा आर्थिक गंडा घातला. याप्रकरणी, कोंढवा येथील 33 वर्षीय तरुणाने कोंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सायबर चोरट्यांच्या विरुद्ध माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 11 ते 13 जुलै या कालावधीत ही घटना घडली. सायबर चोरट्याने तरुणासोबत व्हॉटस्अ‍ॅप आणि टेलिग्रामद्वारे संपर्क केला. त्यानंतर पार्ट टाईम नोकरीचे प्रलोभन दाखवत प्रिपेड टास्कमध्ये पैसे गुंतवणूक करण्यास सांगितले. तरुण सायबर चोरट्यांच्या जाळ्यात अडकला. त्याने आरोपी सांगतील त्याप्रमाणे पैसे गुंतविले. त्यानंतर मात्र आरोपींनी तरुणाला गुंतवणूक केलेली रक्कम व नफाही परत दिला नाही. फसवणूक झाल्यानंतर तरुणाने शिवाजीनगर येथील सायबर पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली होती. त्यानुसार पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे.

खून प्रकरणात एकास जामीन

पूर्ववैमनस्यातून खून केल्याप्रकरणात योगेश रामभाऊ फुरडे याचा जामीन अर्ज सत्र न्यायाधीश डी. व्ही. कश्यप यांच्या न्यायालयाने मंजूर केला. त्याने अ‍ॅड. सचिन झालटे-पाटील व अ‍ॅड. सागर कवडे यांमार्फत जामिनासाठी अर्ज केला. अ‍ॅड. झालटे पाटील व अ‍ॅड. कवडे यांचा युक्तिवाद ग्राह्य धरत न्यायालयाने जामीन मंजूर केला. पूर्वी झालेल्या मारहाणीचा राग मनात धरून सात ते आठ आरोपींनी जुलै 2020 मध्ये प्रेम लिंगदाळे याचा खून केला होता.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news