Grampanchayat Result 2023 : शेळगाव ग्रामपंचायतवर राष्ट्रवादीचा झेंडा

Grampanchayat Result 2023 : शेळगाव ग्रामपंचायतवर राष्ट्रवादीचा झेंडा

शेळगाव : पुढारी वृत्तसेवा : इंदापूर तालुक्यातील शेळगाव ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसने झेंडा फडकवला आहे. सरपंचपदाच्या तिहेरी झालेल्या लढतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते व छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे संचालक लक्ष्मण शिंगाडे यांच्या पत्नी उर्मिला शिंगाडे या ११४ मतांनी विजयी झाल्या.. सोमवारी (दि. ६) शेळगाव ग्रामपंचायतसाठी मतमोजणी पार पडली. या निकालामध्ये शेळगाव ग्रामपंचायत सरपंचपदी पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उर्मिला लक्ष्मण शिंगाडे या विजय झाले आहेत, तर कर्मयोगीचे विद्यमान संचालक राहुल जाधव व अंबादास शिंगाडे यांच्या पत्नीला निवडणुकीचा रिंगणात पराभव पत्करावा लागला आहे. ग्रामपंचायतीवर भाजप पुरस्कृत पॅनल मधून ८ सदस्य तर राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत पॅनल मधुन ९ सदस्य विजयी झाले आहेत.

संबंधित बातम्या :

विशेष वार्ड क्रमांक तीनमधून प्रणिता नितीन जाधव या सुनेने सासू नंदा मधुकर जाधव हिच्यावर मात करत विजय मिळवला आहे. तर तर वार्ड क्रमांक सहामध्ये लताबाई माने हिने जाऊ गंगुबाई माने हीचावर मात करत विजय मिळवला आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news