Grampanchayat Result : बावडा ग्रामपंचायतीवर हर्षवर्धन पाटील यांचे निर्विवाद वर्चस्व | पुढारी

Grampanchayat Result : बावडा ग्रामपंचायतीवर हर्षवर्धन पाटील यांचे निर्विवाद वर्चस्व

बावडा : पुढारी वृत्तसेवा :  इंदापूर तालुक्यातील बावडा ग्रामपंचायतीवर भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी आपले निर्विवाद वर्चस्व कायम ठेवले आहे. ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणूकीत भाजपप्रणित काळेश्वर ग्रामविकास पॅनलच्या उमेदवार पल्लवी रणजीत गिरमे या सरपंचपदी १४३२ मताधिक्याने विजयी झाल्या. ग्रा.पं.चे सरपंचपद हे नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री साठी आरक्षित होते.

बावडा हे हर्षवर्धन पाटील यांचे गाव आहे. ही ग्रामपंचायत इंदापूर तालुक्यातील मोठी ग्रामपंचायत समजली जाते. या ग्रामपंचायतीमध्ये सदस्यांच्या १७ जागा आहेत. यापैकी भाजपप्रणित काळेश्वर ग्रामविकास पॅनलला १२ जागा मिळाल्या तर राष्ट्रवादी काँग्रेस प्रणित पद्मावती परिवर्तन ग्रामविकास पॅनलला ५ जागा मिळाल्या. इंदापूर येथे ग्रामपंचायत निवडणुकीची मतमोजणी पार पडली. बावडा गावच्या जनतेने विकास कामांना साथ दिली आहे, अशी प्रतिक्रिया भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी निकालानंतर दिली.

Back to top button