सेन्सर गॉगलची नितीन गडकरींकडून दखल ; पुण्याच्या विद्यार्थ्याचे केले कौतुक | पुढारी

सेन्सर गॉगलची नितीन गडकरींकडून दखल ; पुण्याच्या विद्यार्थ्याचे केले कौतुक

मंचर : पुढारी वृत्तसेवा :  अवसरी खुर्द (ता. आंबेगाव) येथील न्यू ऑक्सफर्ड इंटरनॅशनलच्या इयता आठवीच्या विद्यार्थ्यांने रस्ते अपघात टाळण्यासाठी बनविलेल्या सेन्सर गॉगलची दखल केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी घेतली आहे. त्यांनी या विद्यार्थ्याचे कौतुक केले . महामार्ग तसेच इतर रस्त्यांवरील अपघाताच्या विविध कारणांमध्ये चालकाला डुलकी लागणे हे प्रमुख कारण आहे. असे अपघात टाळण्यासाठी न्यू ऑक्सफर्ड इंटरनॅशनल स्कूलमध्ये इयत्ता आठवीत शिकत असलेल्या आयुष घोलपने सेंसर गॉगल तयार केला आहे.

या गॉगलबाबत भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष देवदत्त निकम यांनी नाशिक राष्ट्रीय महामार्गाचे समन्वयक दिलीप मेदगे यांच्याशी चर्चा केली. त्यानुसार केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांची दिल्ली येथील निवासस्थानी भेट घेतली. आयुष घोलप या विद्यार्थ्याने तयार केलेल्या सेन्सर गॉगलची माहिती त्यांना दिली. सदर गॉगल हा कमी दरामध्ये चालकांसाठी उपलब्ध करण्यासाठी व यातील काही तांत्रिक बाबींची मदत करण्याची सूचना गडकरी यांनी अधिकार्‍यांना दिल्या. या वेळी शाळेच्या संस्थापिका स्वाती मुळे, सेन्सर गॉगल बनविणार्‍या आयुषचे वडील अमोल घोलप व इतर शिक्षक उपस्थित होते. नितीन गडकरी यांनी आयुष घोलप याला प्रोत्साहित केले.

हे ही वाचा :

Back to top button