Pune Crime News ; पुण्यात एक कोटीचे अवैध मद्य जप्त; ट्रक जप्त | पुढारी

Pune Crime News ; पुण्यात एक कोटीचे अवैध मद्य जप्त; ट्रक जप्त

पुणे; पुढारी वृत्तसेवा : गोवानिर्मित असलेले मद्य अवैधरीत्या विक्री करण्यासाठी नेण्यात येत असलेला ट्रक मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर पकडण्यात आला. या ट्रकची तपासणी करण्यात आली असता सुमारे 75 लाखांचे मद्य सापडले. दरम्यान, याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून, त्यांना वडगाव मावळ न्यायालयात हजर करण्यात आले आहे. त्यांना पोलिस कोठडी देण्यात आली. तसेच मद्य वाहतूक करणारा ट्रक जप्त करण्यात आला असून, एकूण सुमारे 1 कोटी 19 लाख 92 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

राज्य उत्पादन शुल्कच्या पुणे विभागातील सासवड आणि पुणे विभागातील काही अधिका-यांना गोवा निर्मित असलेल्या मद्यांची ट्रकमधून वाहतूक होत असल्याची खबर मिळाली. त्यानुसार मुंबई-पुणे महामार्गावरील रावेत येथील हॉटेल हमराज येथे उत्पादन शुल्क एफ विभाग यांनी सापळा रचला. त्यानुसार चौदा चाकी ट्रकची (एम.एच-15 एफ. व्ही.- 7940) तपासणी केली. त्या जनावरांच्या खाद्याच्या पोत्याखाली गोवा राज्यात विक्री करण्यासाठी असलेला भारतीय बनावटीच्या विदेशी मद्याच्या (रॉयल व्हिस्की, आईस मॅजिक, ऑरेंज व्होडका, रॉयल ब्लंल माल्ट व्हिस्की ) या प्रकारच्या 750 मिली क्षमतेच्या सुमारे 5172 बाटल्या तसेच 180 मिली क्षमतेच्या 37 हजार 680 बाटल्या तसेच 500 मिली क्षमतेच्या बिअरच्या 960 बाटल्या असा एकूण 74 लाख 56 हजार 200 रुपये एवढ्या किमतीचा मद्यसाठा आढळून आला.

यासह वाहनदेखील जप्त करण्यात आले. यामध्ये सुमारे 1 कोटी 19 लाख 92 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या अवैध मद्य वाहतूकप्रकरणी विजय चंद्रकांत चव्हाण (वय-53, रा. सातारा ) आणि सचिन निवास धोत्रे (वय-31, रा. सांगली ) या दोघांना अटक करण्यात आली आहे. त्यांना वडगाव मावळ न्यायालयात हजर करण्यात आले असता त्यांनी पोलिस कोठ्डी देण्यात आली.

ही कारवाई उत्पादन शुल्कच्या पुणे विभागाचे उपआयुक्त विजय चिंचाळकर (प्रभारी ), उत्पादन शुल्क अधीक्षक चरणसिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक दीपक सुपे (एक विभाग),प्रवीण शेलार, राम सुपेकर, बडदे, आशिष जाधव, मोहिते, सागर धुर्वे, डी.के. पाटील, जवान चावरे, अतुल बारगुळे, तात्या शिंदे, अशोक अदमनकर यांनी केली. पुढील तपास निरीक्षक (एफ. विभाग) दीपक सुपे हे करीत आहेत. ऐन सणासुदीच्या तोंडावर दूध उत्पादक शेतकर्‍यांची कोंडी.

हेही वाचा

पावडर, बटरचे दर घटल्याने दूध खरेदीचे दर उतरले

व्ही. पी. बेडेकर अँड सन्सचे संचालक अतुल बेडेकर यांचे निधन

पुणे : लेखापरीक्षकांचा बहिष्कार सकारात्मक चर्चेनंतर मागे

Back to top button