Atul Bedekar passes away | व्ही. पी. बेडेकर अँड सन्सचे संचालक अतुल बेडेकर यांचे निधन | पुढारी

Atul Bedekar passes away | व्ही. पी. बेडेकर अँड सन्सचे संचालक अतुल बेडेकर यांचे निधन

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : मराठी उद्योग जगतातील मोठे नाव आणि व्ही. पी. बेडेकर अँड सन्सचे संचालक अतुल वसंत बेडेकर यांचे निधन झाले आहे. त्यांनी वयाच्या ५६ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. अतुल बेडेकर हे लोणची, मसाले व चटणी या पारंपारिक व्यवसायातील प्रतिष्ठित नाव होते. (Atul Bedekar passes away)

ते गेले काही दिवस कॅन्सरसारख्या दुर्धर आजाराशी झुंजत होते. त्यांचे उपचारादरम्यान एका खासगी रुग्णालयात रात्री १२.३० च्या सुमारास निधन झाले. अतुल बेडेकर यांच्यावर आज दुपारी दक्षिण मुंबईतील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत.

बेडेकर ग्रुप आणि मसाले, लोणची, पापड आदी पारंपरिक पदार्थांचे दुकान व्ही. पी. बेडेकर यांनी १९१० मध्ये गिरगावात सुरू केले होते. त्यानंतर या व्यवसायात सक्रिय होण्यासाठी त्यांचा मुलगा व्ही. व्ही. बेडेकर यांनी १९१७ मध्ये वेगवेगळे मसाले बाजारात आणले. त्यांनी १९२१ मध्ये त्यांनी लोणची बाजारात आणली, ज्यांनी ग्राहकांचे लक्ष वेधून घेतले.

यानंतर ठाकूरद्वार, परळ, दादर आणि फोर्ट येथे बेडेकर मसाल्यांची दुकाने सुरु झाली. बेडेकर ब्रँड आणि त्यांची उत्पादने महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, गोवा, मध्य प्रदेश, छत्तीसगडमध्ये लोकप्रिय आहेत. अमेरिका, कॅनडा, मध्य पूर्व, ऑस्ट्रेलिया, युरोपीय देशांत त्यांची उत्पादने पोहोचली आहेत.

वाढती मागणी लक्षात घेत बेडकर उद्योग समुहाने पाच नवीन उत्पादन युनिट्स सुरु केली. १९४३ मध्ये त्यांनी खाजगी लिमिटेड कंपनी म्हणून स्थापन केली. त्याची सध्याची उलाढाल १०० कोटींहून अधिक आहे.

हे ही वाचा :

Back to top button