दहावी-बारावी 17 नंबर अर्जासाठी मुदतवाढ

दहावी-बारावी 17 नंबर अर्जासाठी मुदतवाढ

पुणे : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च 2024 मध्ये घेण्यात येणार्‍या दहावी – बारावीच्या
परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना खासगीरीत्या 17 नंबरचा अर्ज भरून परीक्षेस बसण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना अतिविलंब शुल्कासह अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. आता विद्यार्थ्यांना अतिविलंब शुल्कासह आजपासून (दि. 1) 7 नोव्हेंबरपर्यंत अर्ज भरता येणार आहे. राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी ही माहिती दिली.

दहावी व बारावीची परीक्षा देऊ इच्छिणार्‍या विद्यार्थ्यांना प्रतिदिन वीस रुपये अतिविलंब शुल्क भरून ऑनलाइन अर्ज भरता येईल, अशी माहिती मंडळाकडून देण्यात आली आहे. विद्यार्थ्याने अर्ज भरण्याकरिता शाळा सोडल्याचा दाखला (मूळ प्रत), नसल्यास द्वितीय प्रत व प्रतिज्ञापत्र, आधार कार्ड, पासपोर्ट आकारातील फोटो स्वतःजवळ ठेवावा. ऑनलाइन अर्ज भरताना कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करायची आहेत.

विद्यार्थ्यांचा मोबाईल क्रमांक व ई-मेल आयडी अनिवार्य आहे. विद्यार्थ्यांनी अर्ज ऑनलाइन नावनोंदणी शुल्क जमा केल्याबाबत पोचपावतीच्या दोन छायाप्रती व मूळ कागदपत्रे नावनोंदणी अर्जावर नमूद केलेल्या माध्यमिक शाळा/ कनिष्ठ महाविद्यालयामध्ये दिलेल्या मुदतीत जमा करायची आहेत. दहावीसाठी 1 हजार रुपये नोंदणी शुल्क व 100 रुपये प्रक्रिया शुल्क आणि प्रतिदिन 20 रुपये अतिविलंब शुल्क, तर बारावीसाठी 600 रुपये नोंदणी शुल्क व 100 रुपये प्रक्रिया शुल्क आणि प्रतिदिन 20 रुपये अतिविलंब शुल्क भरावे लागेल. याव्यतिरिक्त विलंब व अतिविलंब शुल्कही भरावे लागणार आहे.

विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी या वेबसाइटचा वापर करावा.
दहावी-http:// form17. mh- ssc. ac. in

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news