Maratha reservaton Protest : ओतूर येथे साखळी उपोषण
ओतूर : पुढारी वृत्तसेवा : अंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसलेले मनोज जरांगे यांना पाठींबा दर्शविण्यासाठी ओतूर (ता.जुन्नर)येथील ग्रामस्थांच्या वतीने पांढरी मारुतीच्या खुल्या व्यासपीठावर मंगळवार पासून(दि.३१) बेमुदत साखळी उपोषणाला सुरुवात करण्यात आली.
याप्रसंगी "चुलीत गेले नेते आणि चुलीत गेले पक्ष,मराठा आरक्षण एकच आमचे लक्ष",तसेच "एक मराठा लाख मराठा" च्या घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला.
जेष्ठ समाजसेवक तानाजी तांबे, सुधाकर डुंबरे यांनी आपले विचार व्यक्त केले,दरम्यान ओतूर किराणा असोसिएशनसह गावातील सर्व संस्था संघटनांनी या साखळी उपोषणाला उत्स्फूर्त पाठींबा दर्शविला आहे. यावेळी व्यासपीठावर जि प सदस्य मोहित ढमाले,जुन्नर पं स चे माजी सभापती विशाल तांबे,उद्धव ठाकरे शिवसेना नेते संभाजी तांबे,उद्योजक जालिंदर पानसरे,नितीन पन्हाळे,गणेश तांबे,रामदास तांबे,धोंडिभाऊ पानसरे, जयसिंग तांबे यासह मराठा समाजाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
हेही वाचा :

