दौंड शुगर : गळीत हंगामाला अजित पवारांनाच होणार विरोध ? | पुढारी

दौंड शुगर : गळीत हंगामाला अजित पवारांनाच होणार विरोध ?

दौंड : पुढारी वृत्तसेवा : राज्यात मराठा आंदोलनाचे लोण दिवसेंदिवस तीव्र होत चालले असून, नेत्यांना सर्वत्र गावबंदी होत आहे. दौंड शहरालगत असलेल्या आलेगाव येथील दौंड शुगर प्रायव्हेट लिमिटेड साखर कारखान्याचा गळीत हंगाम शुभारंभ महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार व त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या हस्ते गुरुवारी (दि. २ नोव्हेंबर) होत आहे. मात्र, तेथे उपमुख्यमंत्री पवार यांना विरोध होण्याची दाट शक्यता आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार हे सरकारमधील महत्त्वाचे नेते आहेत. मराठा बांधवांचा सरकारवर रोष आहे. त्यामुळे कदाचित अजित पवार यांच्याविरोधात मराठा समाजाकडून आंदोलन होण्याची किंवा निषेध होण्याची शक्यता आहे असे पत्र दौंड शहर तालुका मराठा महासंघाच्या वतीने दौंडचे तहसीलदार आणि दौंडचे पोलिस निरीक्षक यांना देण्यात आले. एकंदरीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात तेथे मराठा समाज एकवटू शकतो. त्यामुळे येत्या काळात अजित पवार काय भूमिका घेतात हे पाहणे गरजेचे आहे.

हेही वाचा :

Back to top button