

पुणे; पुढारी वृत्तसेवा : राज्य उत्पादन शुल्क विभागास पुणे शहर आणि जिल्ह्यात महसुलात गेल्या तीन वर्षांत 20 ते 22 टक्क्यांनी वाढ झाली आहे. या महसुलात मद्यनिर्मिती, मद्यविक्री तसेच इम्पोर्टेड मद्य आयात आणि नूतनीकरणाचा समावेश आहे. राज्याच्या तिजोरीत मुद्रांक शुल्क आणि नोंदणी विभागानंतर उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने सर्वाधिक महसूल मिळत असतो. राज्यातील इतर जिल्ह्यांपेक्षा मुंबईनंतर पुणे जिल्ह्यातून जादा महसूल शासनाकडे जमा होत आहे.
2020-21 मध्ये 1 हजार 797 कोटी, 2021-20 मध्ये 1 हजार 855 कोटी, तर 2022-23 साली 2 हजार 232 कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे. गेल्या तीन वर्षांत एकूण 5 हजार 877 कोटींचा महसूल उत्पादन विभागाकडे जमा झाला आहे. म्हणजेच तीन वर्षांत एकूण महसुलात 20 ते 22 टक्क्यांनी वाढ झाली आहे, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्कच्या पुणे शहर जिल्ह्याचे अधीक्षक चरणसिंह राजपूत यांनी दिली.
राज्य उत्पादन शुल्क विभागास गेल्या तीन वर्षांत महसुलात 20 ते 22 टक्क्यांनी वाढ झाली आहे. हा महसूल मद्यनिर्मिती, मद्यविक्री तसेच इम्पोर्टेड मद्य आयात आणि नूतनीकरणाच्या माध्यमातून मिळालेला आहे.
– चरणसिंह राजपूत, अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क विभाग, पुणे
हेही वाचा