काळजी वाढवणारी बातमी ; पुणे जिल्ह्यात विहिरींच्या पाणीपातळीत घट | पुढारी

काळजी वाढवणारी बातमी ; पुणे जिल्ह्यात विहिरींच्या पाणीपातळीत घट

समीर सय्यद

पुणे : विहिरींची पाणीपातळी ऑक्टोबरमध्ये उच्चपातळीवर असते. मात्र, यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने जिल्ह्यातील विहिरींची पाणीपातळी दोन मीटरपेक्षाही खोल गेली आहे. परिणामी, उन्हाळ्यात शेतीसह पिण्याच्या पाण्याचे संकट उभे राहाणार आहे. यंदा अल निनोच्या प्रभावाने जिल्ह्यात मान्सून सरासरीपेक्षा 12 ते 14 टक्के कमी बरसला. तर पाऊस 20 मि.मी. पेक्षा अधिक पाऊस खूप कमीवेळा बरसला आहे. त्यामुळे विहिरींचे पुनर्भरण झाले नाही. भूजल सर्व्हेक्षण विभागाने दिलेल्या माहितीनुसार, यंदाची भूजल पातळी पाच वर्षांच्या तुलनेत सप्टेंबरअखेर सर्वांत खोल गेली आहे. भूजल सर्व्हेक्षण विभागामार्फत विहिरींच्या पातळीचे सर्व्हेक्षण केले जाते.

संबंधित बातमी :

त्यानुसार जिल्ह्यातील 192 विहिरींचे सर्व्हेक्षण करण्यात आले. त्यामध्ये भूजल पातळी उणे 0.25 ते उणे 2.31 मीटर खोल गेली आहे.
पाणीटंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता असल्याने टँकर सुरू करण्याचे अधिकार प्रांतांधिकार्‍यांना देण्यात आले आहेत. सध्या पुरंदर तालुक्यात अजूनही 12 टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे.

विहीर पुनर्भरणाचा उपयोग नाही
एक विहीर पुनर्भरण करण्यासाठी 18 ते 20 हजारांचा खर्च येतो. याची तरतूद रोजगार हमी योजनेच्या निधीतून करण्यात आली. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील सव्वाचार हजार विहिरींचे पुनर्भरण करण्याचे उद्दिष्ट ठेवले होते. मात्र, परतीचा पाऊस न झाल्याने विहीर पुनर्भरणाचा उपयोग झालेला नाही.

अशी घसरली पातळी (मीटरमध्ये)
तालुका 5 वर्षांपूर्वीची पातळी यंदाची पातळी तुलनात्मक घट
आंबेगाव 1.96 2.65 0.69
बारामती 3.28 53.6 2.08
भोर 0.8 1.37 0.57
दौंड 3.77 4.97 1.20
हवेली 2.71 3.8 0.37
इंदापूर 3.28 5.57 0.29
जुन्नर 4.75 4.02 0.55
खेड 1.4 2.00 0.60
मावळ 0.57 0.94 0.37
मुळशी 0.57 0.94 0.37
पुरंदर 4.39 6.15 1.76
शिरूर 3.1 5.41 2.31
वेल्हे 0.62 0.93 0.31
एकूण सरासरी 2.38 3.33 0.95

Back to top button