Pune News : आता फराळाचीही परदेशवारी ; पोस्ट विभागाची सेवा सुरु | पुढारी

Pune News : आता फराळाचीही परदेशवारी ; पोस्ट विभागाची सेवा सुरु

पुणे : दिवाळीचा फराळ तयार केलाय. पण, पोस्टात येऊन तो पॅक करून पोस्टात जाण्याचा मुहूर्तच उजाडत नाही. हीच बाब हेरून पुणे पोस्ट विभागाने विदेशात फराळ पाठविण्यासाठी घरपोच सेवा सुरू केली आहे. तुम्ही फक्त फराळ द्या, ते पॅक करून विदेशात पाठविण्याची जबाबदारी आमची, अशी योजना पोस्टाने खास दिवाळीनिमित्त सुरू केली आहे. पुण्यातून विदेशात नोकरीनिमित्त, शिक्षणासाठी जाणार्‍यांची संख्या अलीकडील काळात खूप वाढली आहे. प्रत्येकाला दिवाळीनिमित्त भारतात येणे शक्य होत नाही. अशावेळी दिवाळीनिमित्त जगभरातील

आपल्या प्रियजनांना फराळ तसेच भेटवस्तू पाठविणे सोपे व्हावे, यासाठी पुणे पोस्ट विभागाने सर्व पोस्ट ऑफिसमध्ये दिवाळी फराळ परदेशात पाठविण्याची सोय केली आहे. येथे पॅकेजिंगची सुविधासुद्धा उपलब्ध
करून दिली आहे. पोस्टमास्टर जनरल रामचंद्र जायभाये यांनी सांगितले की, आपल्या कामातून वेळ काढून पोस्टात येऊ शकत नसलेल्या लोकांसाठी पुणे पोस्ट विभागाने घरून पार्सल पिकअपची व्यवस्था आपल्या पोस्टमनद्वारे या काळात केली आहे आणि तीसुद्धा मोफत; जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना पोस्टाच्या या पार्सलसेवेचा लाभ घेता येईल.

हेही वाचा

Pune News : मोबाईल अ‍ॅपवरून तिकीट कधी मिळणार?

गोव्यात मॉर्निंग वॉक करताना पोलिस उपनिरीक्षकाचा मृत्यू

सहकार आयुक्तालयाविरोधात लेखापरीक्षकांचा एल्गार

Back to top button