Maratha Reservation : राजगुरूनगरमध्ये मराठा आंदोलकाची प्रकृती खालावली | पुढारी

Maratha Reservation : राजगुरूनगरमध्ये मराठा आंदोलकाची प्रकृती खालावली

राजगुरूनगर(पुणे); पुढारी वृत्तसेवा : मराठा आरक्षणासाठी गेल्या चार दिवसापासून उपोषण करणाऱ्या एका आंदोलनकर्त्याची प्रकृती खालावली असल्याने येथील मराठा आंदोलकांमध्ये प्रक्षोभ वाढत आहे. विकास ठाकुर असे अस्वस्थ आंदोलक युवकाचे नाव आहे. खेड तालुका मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने राजगुरूनगर येथे गेले महिनाभर साखळी उपोषण आंदोलन करीत आहेत. त्यातील ४ कार्यकर्ते दिनांक २६ ऑक्टोबर पासुन उपोषण आंदोलन करीत आहेत.

गेल्या चार दिवसांपासून त्यांनी अन्न पाणी वर्ज्य केले असुन वैद्यकीय सेवा देखील नाकारली आहे. पंचायत समितीचे माजी सभापती अंकुश राक्षे, मनोहर वाडेकर, अजय स्वामी व विकास ठाकुर यांचा त्यात समावेश आहे. रविवारी विकास ठाकुर यांना अशक्तपणा आला असुन त्यांची उठबस थांबली आहे. आंदोलनाच्या व्यासपीठावर ठाकुर झोपुन आहेत. त्यांची प्रकृती अस्थीर झाल्याचा अंदाज वैद्यकिय अधिकारी यांनी नोंदवला आहे.

दरम्यान, आंदोलनात रोज तालुक्यातील विवीध गाव, भागातले आंदोलक आंदोलनात सहभागी होऊन उपोषण आंदोलनाला पाठींबा व्यक्त करीत आहेत. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी अंदोलकाकडून काळजी घेतली जात आहे. मात्र ठाकुर यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे आंदोलकांसह मराठा बांधव आक्रमक बनले आहेत. अंकुश राक्षे, सुदाम कराळे, दिलिप होले, वामन बाजारे, जगन्नाथ राक्षे, उत्तम राक्षे, उमेश बोंबले, विकास जैद, किरण पवार व अन्य आंदोलक उपोषण करणाऱ्या आंदोलकांवर लक्ष ठेऊन आहेत.

हेही वाचा

Pimpri news : पिंपरी शहरात डेंग्यूचा डंख कायम

नाशिक: लोहोणेर येथील गिरणा नदीपात्रात ड्रग शोधण्यासाठी मुंबई पोलीस दाखल

नगर-सोलापूर मार्गावर धुळीचे साम्राज्य

Back to top button