नथीपासून पैंजणापर्यंत सर्व दागिने कागदाचेच | पुढारी

नथीपासून पैंजणापर्यंत सर्व दागिने कागदाचेच

पुणे; पुढारी वृत्तसेवा : प्रवेशव्दारातून आत गेलात की तुम्हाला एक कागदाची महिला दिसते. तिने घातलेल्या नाकातल्या नथीपासून ते पायातल्या पैंजणापर्यंत सर्व दागिने कागदाचेच. ठिकठिकाणी वर्तमानपत्र अन् पुस्तकांचे झुंबर अन् फ्लॉवरपॉट.. हे चित्र आहे कॅम्प भागातील लष्करी महिला अधिकार्‍यांच्या पत्नींनी भरवलेल्या आवा लिटरेचर फेस्टिव्हलमधले.

लष्करी अधिकार्‍यांच्या पत्नींची ’आवा’ ही संघटना 1965 पासून काम करते आहे. कोविड काळात महिलांनी अभिव्यक्तीची चुणूक दाखविली. तब्बल 22 महिलांनी त्यांच्या पतीचे अनुभव कथारूपाने मांडले. त्या सर्व जणी लेखिका झाल्या. त्यामुळे आवा संघटनेने दिल्लीमध्ये 2021 मध्ये लष्करी अधिकार्‍यांच्या महिलांसाठी खास अभिव्यक्ती नावाचे साहित्य संमेलन भरवले. जयपूर येथे 2022 मध्ये, तर सध्या ते पुण्यात भरविण्यात आले आहे. शुक्रवारी देशाचे लष्कर प्रमुख मनोज पांडे यांच्या पत्नी अर्चना पांडे यांनी या प्रदर्शनाचे उद्घाटन केले.

सर्वत्र वर्तमानपत्र अन् पुस्तके

कॅम्प भागातील सदर्न कमांड परिसरात सुरू असलेल्या या साहित्य संमेलनात वर्तमानपत्र, कागद,अन् पुस्तकांची सुंदर सजावट करण्यात आली आहे. संमेलनाच्या प्रवेशव्दारात कागदाची महिला साकारण्यात आली आहे. वर्तमानपत्रापासून तयार केलेली घागरा-चोली तिने घातली आहे. तिच्या अंगावरही सर्व दागिने कागदांचे आहेत. नथीपासून ते पैंजणपर्यंत सर्व दागिने मोठ्या खुबीने तयार केले आहे. शनिवारी या ठिकाणी पत्रकार रजत शर्मा यांनी हजेरी लावली. रविवारी या लिटरेचर फेस्टिव्हलचा समारोप होत आहे. प्रसिद्ध लेखक चेतन भगत या ठिकाणी आपले मनोगत व्यक्त करणार आहेत.

हेही वाचा

Weather Update : महाबळेश्वरपेक्षा पुणे थंड

ब्रेकिंग! अजित पवारांना डेंग्यूची लागण

Ajit Pawar News : पुण्यात भावी मुख्यमंत्री म्हणून अजित पवारांचे बॅनर

Back to top button