कोल्हापूर-पुणे-कोल्हापूर विशेष रेल्वे सुरू

कोल्हापूर-पुणे-कोल्हापूर विशेष रेल्वे सुरू

मिरज; पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूर – पुणेदरम्यान सह्याद्री एक्स्प्रेसच्या वेळेत रेल्वेकडून नवी एक्स्प्रेस सुरू केली आहे. 5 नोव्हेंबरपासून या रेल्वेची सुरुवात होत आहे. प्रायोगिक तत्त्वावर दोन महिने ही एक्स्प्रेस चालविण्यात येणार आहे.

कोल्हापूर-मुंबई सह्याद्री एक्स्प्रेस बंद झाल्यानंतर पुण्याकडे जाणार्‍या प्रवाशांची गैरसोय होत होती. पुण्यापर्यंत प्रवास करणार्‍या प्रवाशांना अनेकवेळा आरक्षित तिकीट देखील मिळत नव्हते. त्यामुळे सह्याद्री एक्स्प्रेस सुरू करण्याबाबत मिरज रेल्वे कृती समितीकडून वारंवार मागणी करण्यात येत होती. खासदार संजय पाटील यांनी देखील पुणे येथे आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत सह्याद्री एक्स्प्रेस सुरू करण्याची मागणी केली होती. त्यानुसार आता रेल्वेकडून सह्याद्री एक्स्प्रेसच्या वेळेत पर्यायी रेल्वे सुरू केली आहे. 5 नोव्हेंबर ते 31 डिसेंबरपर्यंत ही एक्स्प्रेस चालविण्यात येणार आहे.

ही एक्स्प्रेस कोल्हापूर येथून रात्री 11.30 वाजता सुटेल. ही गाडी मिरजेत 12. 30 मिनिटांनी येईल, तर पुणे येथे सकाळी 8.45 वाजता पोहोचेल. परतीच्या प्रवासात ही गाडी पुण्यातून रात्री 21.45 वाजता सुटेल, मिरजेत मध्यरात्री 3.15 वाजता येईल, तर कोल्हापूरमध्ये पहाटे 5.40 वाजता पोहोचेल.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news