Pune News : महाबली केसरी किताबावर तुषार डुबेची मोहर | पुढारी

Pune News : महाबली केसरी किताबावर तुषार डुबेची मोहर

आळंदी : पुढारी वृत्तसेवा :  पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाची वरिष्ठ गादी व माती अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा चिंबळी (ता. खेड) येथे शनिवार (दि. 21) व रविवारी (दि. 22 ) रोजी पार पडली. स्पर्धेत पुणे जिल्हातून 175 ते 180 मल्ल सहभागी झाले होते. यामध्ये आंतरराष्ट्रीय कुस्ती केंद्राचा मल्ल व वस्ताद काकासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करणार्‍या तुषार डुबे याने मनीष रायते याचा पराभव करून महाबली किताबावर नाव कोरले. महाराष्ट्र केसरीच्या धर्तीवर महाराष्ट्र केसरी वजन गटातील गादी व माती विभागातील विजेत्या कुस्तीगीरांमध्ये पुणे जिल्हा महाबली केसरी या किताबाची लढत लावली जाते. महाबली किताबासाठी चांदीची गदा दिवंगत रामभाऊ कारले यांच्या स्मरणार्थ मल्ल उमेश कारले यांच्या वतीने देण्यात येते.

स्पर्धेचे आयोजन स्वयंभू प्रतिष्ठान व चिंबळी ग्रामस्थ यांच्या वतीने व पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाच्या सहकार्याने करण्यात आले होते. विजेते मल्ल फुलगाव (ता. हवेली) येथे होणार्‍या 66व्या राज्य वरिष्ठ गट अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत भिडणार आहेत, अशी माहिती पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष संदीप भोंडवे, बाजार समिती माजी संचालक, माजी सरपंच पांडुरंग बनकर यांनी दिली. बक्षीस वितरणप्रसंगी आ. दिलीप मोहिते पाटील, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, माजी सभापती मंगलदास बांदल, उपसरपंच चेतन बर्गे, ग्रामपंचायत सदस्य काळूराम बनकर, माजी ग्रामपंचायत सदस्य शंकर जैद, दत्तात्रय लोखंडे, तानाजी जैद, अक्षय जगनाडे, राजू जाधव, महेश कड उपस्थित होते.

हे ही वाचा :

Back to top button