Pune News : पुण्यातील चांदणी चौकातील रस्त्याच्या गालावर खळी; तीन महिन्यातच रस्त्याची दुरावस्था | पुढारी

Pune News : पुण्यातील चांदणी चौकातील रस्त्याच्या गालावर खळी; तीन महिन्यातच रस्त्याची दुरावस्था

पौड रोड ; पुढारी वृत्तसेवा : चांदणी चौकातून एनडीएकडून मुळशीकडे जाणार्‍या नव्या रस्त्यावर खड्डा पडल्याने प्रवाशांसह नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय) या कामाची तपासून करण्याची मागणी  होत आहे. चांदणी चौकातील उड्डाणपुलाचे उद्घाटन काही दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले.

हा उड्डाणपूल वाहतुकीसाठी सुरू होऊन महिन्याचा कालावधी उलटला नाही तोच एनडीएकडून मुळशीकडे जाणार्‍या मार्गावर खड्डा आहे. यामुळे नागरिक व प्रवाशांकडून या कामाच्या दर्जाविषयी प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. ’एनएचएआय’ने या उड्डाणपुलाची तपासणी करून त्रुटी दूर करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

हेही वाचा

Maratha Reservation | मराठा आरक्षण प्रश्नी हसन मुश्रीफांना जिल्हा बंदीचा इशारा

मुंबई पोर्ट ट्रस्ट परिसरात महिलेची हत्या करुन मृतदेह जाळला

घृणास्पद ! एका मुलीवर दोघांचा चार वर्षे अत्याचार

Back to top button