Pune News : कंपनी अधिकार्‍याकडून 56 लाखांची फसवणूक | पुढारी

Pune News : कंपनी अधिकार्‍याकडून 56 लाखांची फसवणूक

पुणे : कंपनीच्या अधिकार्‍याने 11 वाहनांचे टॅक्स व नोंदणी न करता 56 लाख 34 हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. बंडगार्डन परिसरात आयएससी प्रोजेक्ट प्रा. लि. येथील कंपनीत सीनिअर एक्झिक्युटिव्ह या पदावर हा अधिकारी काम करीत आहे. कंपनीने खरेदी केलेल्या 29 वाहनांचे टॅक्स व नोंदणी फी भरण्याचे काम वश्वासाने त्याच्यावर सोपविले होते.
बंडगार्डन पोलिस ठाण्यात शिवांश विनय कुमार (वय 30, रा. मुजोल, बिहार) या आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे.

अजय गोरख शेळके (रा. वडगाव शेरी) यांनी आरोपींविरोधात पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. सदरचा प्रकार मार्च 2023 नंतर घडला. कंपनीने विश्वासाने शिवांश कुमार याच्याकडे टॅक्स व नोंदणीचे काम सोपविले होते. आरोपीने के. एस. नरसिंगराव याच्या बँक खात्यावर कंपनीची दिशाभूल करून एकूण 96 लाख 76 हजार रुपये पाठविण्यास सांगितले. त्यातील 56 लाख 34 हजार रुपये स्वत:च्या वापरासाठी ठेवून त्यापैकी काही रक्कम शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून रकमेचा अपहार केला. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक एस. पवार करीत आहेत.

हेही वाचा : 

Back to top button