कुरकुंभ : पुढारी वृत्तसेवा : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर पाटस घाटाच्या परिसरात रस्त्याच्या कडेला थांबलेल्या एका ट्रकला एक खासगी ट्रॅव्हल्स बस धडकून भीषण अपघात झाला आहे. प्राथमिक माहितीनुसार या अपघातात २ जण ठार झाले असून १५ पेक्षा जास्त प्रवाशी जखमी झाले आहे. जखमींना वेगवेगळ्या खाजगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. गुरूवार (दि. २६) पहाटे हा प्रकार घडला.
याबाबत अधिक माहितीनुसार, पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरून जाताना पाटस (ता. दौंड) हद्दीत सिमेंट वाहतुकीच्या ट्रकचा टायर फुटल्यामुळे हा ट्रक (एमएच १२ युएम २८५४) घटनास्थळी रस्त्याच्या कडेला उभा केला होता. दरम्यान खासगी ट्रॅव्हल्स बस (एमएच ०९ सीव्ही ४५९७) लातूरहून पुण्याच्या दिशेने निघाली होती. यादरम्यान पहाटे थांबलेल्या ट्रकला पाठीमागून या ट्रॅव्हल्स बसची जबर धडक झाली. या अपघातात बसच्या समोरील एका बाजूच्या भागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. जखमींना दौंड तालुक्यातील वेगवेगळ्या रूग्णालयात दाखल केले आहे. जखमी व मयत प्रवाशी नेमके कुठले याबाबत चौकशी सुरू आहे. घटनास्थळी पाटस पोलीस दाखल झाले होते.
हे ही वाचा :