Pune : दूध संघाच्या शीतकरण केंद्रात गुपचूप कांदा रोपांची लागवड

Pune : दूध संघाच्या शीतकरण केंद्रात गुपचूप कांदा रोपांची लागवड
Published on: 
Updated on: 

ओतूर : पुढारी वृत्तसेवा :  पुणे जिल्हा दूध उत्पादक संघ (कात्रज डेअरी) संचालित ओतूर (ता. जुन्नर) येथील ओतूर दूध शीतकरण केंद्राच्या सुमारे दोन एकर क्षेत्रात केंद्रप्रमुख सी. एस. लामखडे यांनी संघाची कोणतीही परवानगी न घेता परस्पर पैसे मिळवून देणारे नगदी पीक कांदा रोपांची लागवड केली आहे. या कांदा रोप विक्रीनंतर होणारे रोख स्वरूपातील उत्पन्न नक्की कोणाला? असा प्रश्न विचारला जाऊ लागला आहे. याबाबत संघाकडून सखोल चौकशी करण्याची मागणी होऊ लागली आहे. ओतूर दूध शीतकरण केंद्राचे एकूण क्षेत्र अंदाजे पावणेचार एकर आहे. यापैकी दीड एकर क्षेत्रात शीत केंद्राची इमारत असून, इमारतीच्या मागील बाजूस सुमारे दोन एकर क्षेत्रात आंब्याची बाग आहे. या बागेत कांदा रोपांची गुपचूप लागवड करण्यात आली आहे. शीतकरण केंद्राला प्रत्यक्ष भेट देऊन तेथील कर्मचार्‍यांसोबत संवाद साधला असता, त्यांनी लागवड केंद्र व्यवस्थापक यांनीच केली असल्याचे सांगितले.

या गुपचूप कांदा रोप लागवडीसाठी आम्ही कोणतीही परवानगी दिलेली नाही.
                                         – भगवान पासलकर, अध्यक्ष, कात्रज दूध संघ

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news