Navratri festival 2023 : आज शस्त्रपूजनाची खंडेनवमी, उद्या शिळा दसरा, जाणून घ्या महत्त्व | पुढारी

Navratri festival 2023 : आज शस्त्रपूजनाची खंडेनवमी, उद्या शिळा दसरा, जाणून घ्या महत्त्व

– पं. वसंतराव गाडगीळ, पुणे (शारदा ज्ञानपीठाचे प्रमुख, धर्मशास्त्राचे अधिकारी)

नवरात्रौत्सवातील महत्त्वाचा दिवस म्हणजे खंडेनवमी. या तिथीला शस्त्रास्त्रांची पूजा केली जाते. उद्योग आणि व्यवसायात यंत्रांची, उपकरणांची आणि वाहनांची पूजा केली जाते. झेंडूची फुले आणि आपट्याची पाने शस्त्रे, यंत्रे यांच्यावर वाहिली जातात. खंडेनवमी आणि विजयादशमी – दसरा हे अनेकदा एका दिवशी येतात. नवमी व दशमी तिथी स्वतंत्र येते, तेव्हा अशा विजयादशमीला शिळा दसरा म्हणतात.

यंदा विजयादशमी स्वतंत्र तिथी असल्याने यंदाचा दसरा हा रूढीप्रमाणे शिळा दसरा आहे. बहुतांश विजयादशमीला श्रवण नक्षत्र असते. पण यावेळी घनिष्ठा नक्षत्र आलेले आहे. दसर्‍याला श्रवण नक्षत्राच्या तुलनेत घनिष्ठा नक्षत्र गौण म्हटले जाते. यावर्षी खंडेनवमीला श्रवण नक्षत्र आहे. त्यामुळे खंडेनवमीलाच शस्त्रे, यंत्रे, उपकरणे, वाहने आदींची झेंडू फुलांनी पूजा करून आपट्याची पाने वाहावीत.

हे ही वाचा :

 

Back to top button