Pimpri News : आठवड्याभराने 5 जलतरण तलाव पुन्हा सुरू | पुढारी

Pimpri News : आठवड्याभराने 5 जलतरण तलाव पुन्हा सुरू

पिंपरी : कासारवाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर जलतरण तलाव येथे क्लोरीन गॅसची गळती झाल्याने 19 जणांना बाधा झाली. हा प्रकार 10 ऑक्टोबरला सकाळी घडला होता. त्या दिवसांपासून बंद असलेले सातपैकी पाच तलाव सुरू करण्यात आले आहेत. तर, उर्वरित दोन तलाव गुरूवारी (दि.19) किंवा शनिवारी (दि.21) सुरू करण्यात येणार आहेत.

क्लोरीन गॅसची गळती झाल्याने अनेकांना बाधा झाली. सुदैवाने गंभीर प्रकार घडला नाही. त्या दिवसांपासून सर्व सात तलाव नागरिकांनी बंद करण्यात आले. सर्व तलावावरील पाणी शुद्धीकरण यंत्रणेची पाहणी करून त्रुटी दूर करण्यात आल्या. तसेच, क्लोरीन गॅसऐवजी क्लोरीन पावडरचा वापर करून पाणी शुद्धीकरण केले जात आहे. पाण्याचा चाचणी अहवाल सकारात्मक आल्याने तलाव नागरिकांसाठी खुला करण्याचा निर्णय क्रीडा विभागाने घेतला आहे.

पिंपळे गुरव, पिंपरी गाव, संभाजीनगर, वडमुखवाडी, नेहरूनगर असे पाच तलाव सोमवारी (दि.16) खुले करण्यात आले आहेत. तर, कासारवाडीचा तलावातील पाण्याची चाचणी घेण्यात आली आहे. पाणी शुद्ध असल्याने तो तलाव मंगळवारी (दि.17) सुरू करण्याचे नियोजन होते. मात्र, तो गुरूवार (दि.19) पासून खुला करण्यात येणार आहे. केशवनगर येथील तलाव पाणी गढूळ असल्याने तो तलाव शनिवारी (दि.21) सुरू करण्याचे नियोजन आहे, असे महापालिकेच्या क्रीडा विभागाचे उपायुक्त मिनीनाथ दंडवते यांनी सांगितले.

हेही वाचा

Pimpri News : बेकायदा प्रवासी वाहतूक; आरटीओची कारवाई

मनीष सिसोदिया यांना दिलासा नाहीच, न्‍यायालयीन कोठडीत २२ नोव्‍हेंबरपर्यंत वाढ

राज्यातील सूतगिरण्यांच्या कर्जावरील व्याज पाच वर्षे शासन भरणार; मंत्रिमंडळाचा निर्णय

Back to top button