

पुणे; पुढारी वृत्तसेवा : ललित पाटील संदर्भातील मला सर्व ब्रीफ करण्यात आले आहे. मी आणखी या संदर्भात माहिती घेत असून लवकरच मोठा नेक्सेस बाहेर पडेल असं सूचक विधान महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. ते पुण्यात एका कार्यक्रमासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी पुणे विमानतळावर पत्रकारांशी संवाद साधला.
संबंधित बातम्या :
पुण्यात एका कार्यक्रमासाठी बुधवारी सायंकाळी चारच्या सुमारास देवेंद्र फडणीस आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले या प्रकरणात कोणालाही सोडले जाणार नाही, प्रत्येकावर योग्य ती कडक कारवाई केली जाणार आहे. लवकरच या संदर्भातील नेक्सेस बाहेर पडतील. असे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
शिंदे गटाला लोकसभेसाठी 22 जागा देणार का असा प्रश्न विचारला असता त्यांनी या प्रश्नाला नकार दिला. ते म्हणाले ज्याला जितक्या जागा द्यायच्या आहेत, त्या आम्ही देऊ याबाबत आत्ताच काही सांगू शकत नाही. असेही राज्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.