Lalit Patil : ललित पाटीलला सोमवारपर्यंत पोलीस कोठडी | पुढारी

Lalit Patil : ललित पाटीलला सोमवारपर्यंत पोलीस कोठडी

पुढारी ऑनलाईन डेस्क : पुण्याच्या ससून हॉस्पिटल मधून ड्रगची तस्करी करणारा ललित पाटील याला मुंबई पोलिसांनी चेन्नईमधून बेड्या ठोकल्या आहेत. यानंतर ललित पाटीलला अंधेरीच्या न्यायालयात हजर करण्यात आले. त्यानंतर न्यायालयाकडून ललित पाटीलला कोर्टाने 23 ऑक्टोबरपर्यंत पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली असल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे.

ललित पाटील येरवडा कारागृहात शिक्षा भोगत असताना त्याला उपचारासाठी ससून रुग्णालयाती दाखल करण्यात आले होते. मात्र ललित पाटील हा कॅन्टीनमधील दोन कामगारांच्या मदतीने मेफेड्रॉन अमली पदार्थ विक्री करत होता. या प्रकरणी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी रुग्णालय परिसरातून दोघांना अटक करून त्यांच्या ताब्यातून सुमारे दोन कोटी रुपयांचे मेफेड्रॉन अमली पदार्थ जप्त केले होते. या सर्व प्रकारानंतर पाटील याला दोन ऑक्टोबरला रात्री आठ वाजण्याच्या सुमारास एक्स रे काढण्यासाठी नेत असताना पोलिसांना चकवा देत तो फरार झाला होता, मात्र मुंबई पोलिसांनी सापाला रचत त्याला अटक केली.

ससून रुग्णालयातून झाला होता फरार

ससून रुग्णालयातून ड्रग माफिया ललित पाटील हा आरोपी दोन आक्टोबरला रात्री रुग्णालय प्रशासनाला चकवा देत पसार झाला होता. या प्रकारानंतर ससून रुग्णालय प्रशासनावर अनेक आरोप प्रत्यारोप केले जात होते .या घटनेने पुण्यासह राज्यभरात एकच खळबळ उडाली होती.

पोलिसांना फोडला होता घाम

पोलिसांना अक्षरशः त्याने घाम फोडला होता. जंग-जंग पोलीस त्याला शोधत होते. तरी तो सापडत नव्हता. अखेर ललित पाटील चेन्नईमध्ये असल्याची माहिती मुंबई गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानंतर त्याला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. त्यामुळे पोलीस यंत्रणेनेदेखील सुटकेचा निश्वास सोडला आहे. आरोपी ललित पाटीलला आज मुंबईला आणण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Back to top button