Pimpri news : रेड झोनमध्ये अनधिकृत बांधकामे जोरात

Pimpri news : रेड झोनमध्ये अनधिकृत बांधकामे जोरात

पिंपरी; पुढारी वृत्तसेवा : रेड झोन असलेल्या त्रिवेणीनगर, ताम्हाणेवस्ती, म्हेत्रे वस्ती, गोरे वस्ती या भागांत मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे सुरू आहेत. बांधकामे करून गोरगरीबांना तेथील सदनिका व गाळ्याची विक्री केली जात आहे. धोकादायक पद्धतीने होत असलेल्या या अनधिकृत बांधकामांकडे फ क्षेत्रीय कार्यालयाचे साफ दुर्लक्ष होत आहे, अशी तक्रार राष्ट्रवादी काँग्रेस वाहतुक महासंघाचे शहराध्यक्ष काशिनाथ जगताप यांनी केली आहे.

या संदर्भात त्यांनी महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्याकडे तक्रार केली आहे. जगताप यांनी तक्रारीत म्हटले आहे की, रेड झोन असूनही या परिसरात अनधिकृत बांधकामे जोरात चालू आहेत. त्रिवेणीनगरमध्ये अती उच्चदाब विद्युत वाहन टॉवर लाइन खाली बेकायदेशीर गाळे बांधून त्यांची महापलिकेच्या मिळकतकरासाठी नोंदही करण्यात आल्या आहेत.

त्या बेकायदेशीर गाळ्याची विक्री करण्यात आली आहे. तसेच, कृष्ण सोसायटी डिपी रोडजवळ त्रिवेणीनगर व ताम्हाणेवस्ती दोन्ही बाजूने बेकायदा बांधकाम सुरू आहेत. अशी बांधकामे करून गोरगरीब नागरिकांना विक्री करून बांधकाम व्यावसायिक त्यांची आर्थिक फसवणूक करत आहेत.

या संदर्भात तक्रारी करूनही क्षेत्रीय अधिकारी सीताराम बहुरे हे याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहेत. त्याचा वरदहस्त असल्याने ही बांधकामे सुरू आहेत. ते त्या बांधकाम व्यावसायिकांना पाठीशी घालत आहेत, असा आरोप जगताप यांनी केला आहे. या प्रकाराची सखोल चौकशी करावी.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news