Savitribai Phule Pune University : व्यवस्थापन परिषदेच्या दोन जागांसाठी पाच जण स्पर्धेत

Savitribai Phule Pune University : व्यवस्थापन परिषदेच्या दोन जागांसाठी पाच जण स्पर्धेत

पुणे; पुढारी वृत्तसेवा : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेवर विद्या परिषदेतून दोन सदस्य निवडून द्यायचे आहेत. त्यासाठी निवडणूक प्रक्रिया सुरू असून, सोमवारी (दि. 16) अर्जांची छाननी पार पडली. यामध्ये चार जणांचे अर्ज बाद झाले. त्यामुळे आता अध्यापक गटातील तीन तसेच महिला गटातील चार, असे सात अर्ज आहेत. परंतु, यातील दोन महिलांचे दोन्ही गटांत अर्ज असल्यामुळे 2 जागांसाठी 5 जण स्पर्धेत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

विद्या परिषदेने तिच्या सदस्यांमधून व्यवस्थापन परिषदेसाठी दोन सदस्य निवडून द्यायचे आहेत. त्यासाठी एकूण 11 जणांचे अर्ज आले होते. त्यामध्ये सर्वाधिक सात अर्ज अध्यापक गटासाठी होते. त्यापैकी चौघांचे अर्ज बाद करण्यात आले आहेत. विद्या परिषदेवर निर्वाचित अध्यापक असल्याची अट पूर्ण करीत नसल्याच्या कारणास्तव हे अर्ज बाद करण्यात आले. अध्यापक गटात आता तीन, तर महिला गटात चार अर्ज आहेत. दोन महिला उमेदवारांचे दोन्ही गटांतून अर्ज आहेत. दोन्ही गटांतून प्रत्येकी एका सदस्याची निवड केली जाणार आहे.

अध्यापक गटातील पात्र अर्ज

संगीता विजय जगताप (पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे बाबूरावजी घोलप महाविद्यालय, सांगवी)
राजश्री गहिनीनाथ जायभाय (आदर्श शिक्षण मंडळीचे आदर्श महाविद्यालय, कर्वे रस्ता)
तुकाराम बारकू रोंगटे (मराठी विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ)

महिला गटातील पात्र अर्ज

ज्योत्स्ना गजानन एकबोटे (प्रोग्रेसिव एज्युकेशन सोसायटी, पुणे)
संगीता विजय जगताप (पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे बाबूरावजी घोलप महाविद्यालय, सांगवी)
राजश्री गहिनीनाथ जायभाय (आदर्श शिक्षण मंडळीचे आदर्श महाविद्यालय, कर्वे रस्ता)
वीणा मधुसुदन नरे (समाजश्री प्रशांतदादा हिरे कला, विज्ञान, वाणिज्य महाविद्यालय, नाशिक)

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news