देशातील गरिबीचे प्रमाण लक्षणीयरीत्या घटले | पुढारी

देशातील गरिबीचे प्रमाण लक्षणीयरीत्या घटले

पुणे; पुढारी वृत्तसेवा : देशाच्या दारिद्य्र निर्देशांकात आठ वर्षांत कमालाची सुधारणा झाली असून, गरिबांच्या घरात गॅस,पाणी, विजेचे कनेक्शन व रहावयास घर मिळत असल्याने दारिद्य्रात दहा पटींनी घट झाली आहे. सरकारने याबाबत नुकत्याच केलेल्या सर्वेक्षणात ही आकडेवारी समोर आली आहे. आपल्या देशात दारिद्य्र रेषेखाली अजूनही मोठी लोक संख्या जगत आहे.

2015-16या वर्षात हा निर्देेशांक 24.85 इतका होता.त्यात 2023 मध्ये तब्बल 10 टक्यांनी घट झाली आहे.तो निर्देशांक आता 14.19 टक्क्यांवर खाली आला आहे. याची कारणे देताना सर्वेक्षणांत असा निष्कर्ष काढला आहे की गरिबांच्या घरांत मोठ्या प्रमाणावर गॅस, वीज, पाणी, शिक्षण या मूलभूत गरजा पोहोचवण्यात सरकारने युद्ध पातळीवर प्रयत्न केले त्याचा हा परिणाम आहे.

14 मुद्द्यांवर केले सर्वेक्षण

या सर्वेक्षणांत एकूण 14 इंडिकेटवर अभ्यास केला गेला. त्यात प्रामुख्याने कुटुंबाचा आहार, मानसिक, शारीरिक आरोग्य, शाळेतील हजेरीपट, स्वयंपाकासाठी वापरण्यात येणारे इंधन, वीज कनेक्शन, बँकेंतील बचत खाते याचा राज्यवार आढावा घेण्यात आला. देशातील 36 राज्ये यात पास झाली असून, काही राज्यांत निर्देशांक 51 टक्क्यांवरून 20 ते 25 टक्क्यांवर खाली आला आहे.

राज्यवार दारिद्य्राचा निर्देशांक…(टक्के)

राज्य 2015 2023
बिहार 51.89 33.76
झारखंड 42.10 28.81
मेघालय 32.10 27.7
उत्तर प्रदेश 37.9 22.9
आसाम 32.65 19.35
छत्तीसगड 29.96 19.35
ओडिशा 29.90 16.37
नागालँड 25 15
राजस्थान 28 15
अरुणाचल 28 13
त्रिपुरा 24 13
पं. बंगाल 21 11
राज्य 2015 2023
गुजरात 18 09
महाराष्ट्र 14.8 8.1
कर्नाटक 12 7.5
आंध्र प्र. 11 4.3
तेलंगणा 13 4.3
मिझोराम 13 5
हिमाचल 7.5 5.8
पंजाब 5.5 4.5
सिक्कीम 3.8 2.5
तामिळनाडू 4.7 2.2
गोवा 3.7 0.84
केरळ 0.70 0.55

  • आठ वर्षांत दहा टक्क्यांनी दारिद्य्रात घट
  • घराघरांत स्वयंपाकाचा गॅस, सांडपाणी व्यवस्थापन सुधारल्याचा परिणाम

Back to top button