Pune : खेड तालुक्यात होणार जरांगे यांची जाहीर सभा | पुढारी

Pune : खेड तालुक्यात होणार जरांगे यांची जाहीर सभा

राजगुरूनगर : पुढारी वृत्तसेवा : मराठा आरक्षण आंदोलन कर्ते मनोज जरंगे पाटील यांची राजगुरूनगर येथे शुक्रवारी (दि. २०) जाहीर सभा होणार असल्याची माहिती पंचायत समितीचे माजी सभापती अंकुश राक्षे यांनी दिली. मराठा आरक्षण आंदोलन आणि त्यावरुन सरकारची झालेली कोंडी, तसेच जरांगे पाटील यांनी नुकतीच घेतलेली विराट मराठा सभा यामुळे खेड तालुक्यात होणाऱ्या या सभेला महत्त्व प्राप्त झाले आहे.

संबंधित बातम्या :

जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या मराठा आरक्षण आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी खेड तालुका मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने गेल्या १ ऑक्टोबर पासून राजगुरूनगर येथे बेमुदत साखळी उपोषण आंदोलन सुरू आहे.खेडच्या या आंदोलनाला पाठबळ देण्यासाठी मनोज जरांगे पाटील भेट देऊन येथे आयोजित सभेला संबोधीत करणार आहेत. सभेसाठी मराठा बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन माजी सभापती अंकुश राक्षे यांनी केले आहे.

Back to top button