महत्त्वाची बातमी ! मुंबई -पुणे एक्सप्रेस वे आज इतक्या वेळेसाठी राहील बंद

महत्त्वाची बातमी ! मुंबई -पुणे एक्सप्रेस वे आज इतक्या वेळेसाठी राहील बंद

पुढारी डिजिटल : मुंबई – पुणे एक्सप्रेस हायवे वर आज पुन्हा एकदा एक तासाचा ब्लॉक असणार आहे. हायवेवर मोठे दिशादर्शक फलक बसवण्यासाठी हा ब्लॉक करण्यात येणार असल्याच समोर येत आहे. दुपारी 12 ते 1 दरम्यान पुण्याच्या दिशेने जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद राहणार आहे. या ब्लॉकमुळे पुण्याकडे येणारी वाहतूक वळवण्यात आली आहे.

बोरघाट हद्दीत आडोशी बोगदाजवळ काम सुरू असल्याने हा ब्लॉक घेण्यात आल्याच समोर येत आहे. काम सुरू असताना पूर्ण तासभर  सर्व प्रकारची वाहतूक खालापूर टोल नाका येथे तसेच शोल्डर लेनवर थांबवली जाणार आहे. मागील आठवड्यातही या हायवेवर दोन तासांचा ब्लॉक घेण्यात आला होता. पण हे काम अर्ध्या तासातच आटोपल्याने वाहतूक लगेच सुरळीत करण्यात आली होती.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news