समितीचे सदस्य दिवसभर ससून रुग्णालयामध्ये ठाण मांडून होते. त्यांनी कैद्यांच्या वॉर्ड क्रमांक 16 मध्येही भेट दिली. कैद्यांची कशाप्रकारे बडदास्त ठेवण्यात येते, त्यांच्यावर कशा पध्दतीने उपचार केले जातात, अशा अनेक निकषांचा अभ्यास करत सखोल माहिती जाणून घेतली. अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांच्यासह कैद्यांवर उपचार करणारे डॉक्टर, वॉर्डशी संबंधित कर्मचारी असे तब्बल 80 जणांचे जबाब नोंदवून घेतले आहेत. कैदी रुग्णांना अॅडमिट करून घेतल्याची कारणे, आजारांचे निदान, उपचार, ते किती दिवस अॅडमिट होते, याबाबत कसून चौकशी केली.