राष्ट्रवादीचे पॅलेस्टाईनला समर्थन; शरद पवार यांनी मांडली भूमिका | पुढारी

राष्ट्रवादीचे पॅलेस्टाईनला समर्थन; शरद पवार यांनी मांडली भूमिका

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्यापासून अटलबिहारी वाजपेयींपर्यंत सर्वच पंतप्रधानांनी इस्रायल-पॅलेस्टाईन संघर्षात (Israel-Hamas War) पॅलेस्टाईनच्या बाजूने भूमिका घेतली. पॅलेस्टाईनला मदत करण्याच्या भूमिकेत बदल झाला नव्हता. आता मात्र वेगळी भूमिका घेतली जात असल्याचे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसची स्वच्छ भूमिका ही पॅलेस्टाईनच्या समर्थनाची असल्याचे पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी रविवारी स्पष्ट केले.

मुंबई विभागीय राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांचा रविवारी दक्षिण मुंबईत मेळावा पार पडला. मेळाव्यात पक्षाच्या मुंबई अध्यक्षपदी राखी जाधव यांची नियुक्ती करण्यात आली. राष्ट्रवादीतील बंडाळीपूर्वी मुंबईचे अध्यक्षपद नवाब मलिक यांच्याकडे होते. शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली. (Israel-Hamas War)

कंत्राटी नोकरभरतीचा विशेषतः पोलिस खात्यात कंत्राटी नेमणुका करण्याचा घातक निर्णय देशात कुणीच घेतला नाही. असा निर्णय राज्यातल्या सरकारने घेतला आहे. विविध सामाजिक आरक्षण नसलेले, पुरेसे प्रशिक्षण नसलेले कंत्राटी पोलिस दल राज्याच्या हिताचे नाही. तसेच देशात भाजपविरोधात वातावरण असल्याचेही पवार म्हणाले.

Back to top button