Pune Railway News : सणासुदीच्या काळात रेल्वेच्या विशेष फेर्‍या; पुण्यातून 28 फेर्‍या होणार | पुढारी

Pune Railway News : सणासुदीच्या काळात रेल्वेच्या विशेष फेर्‍या; पुण्यातून 28 फेर्‍या होणार

पुणे : पुढारी वृत्तसेवा : मध्य रेल्वेच्या वतीने दिवाळी, दसरा आणि छठ पुजा या सणासाठी 74 विशेष फेर्‍यांचे नियोजन करण्यात आले आहे. यात 28 फेर्‍या पुण्यातून होणार असून, उर्वरीत मुंबईवरून होतील, असे रेल्वे प्रशासनाने सांगितले. पुण्यातून पुणे-अजनी वातानुकुलित सुपरफास्ट साप्ताहिक विशेष रेल्वे गाडीच्या 14 फेर्‍या होणार असून, या गाडीला 20 एलएचबी कोच असतील.
ही गाडी दि. 17 ऑक्टोबर ते 28 नोव्हेंबर 2023 दरम्यान (7 फेर्‍या) दर मंगळवारी पुणे स्टेशन येथून दुपारी 3 वाजून 15 मिनिटांनी सुटेल आणि दुसर्‍या दिवशी सकाळी 4 वाजून 50 मिनिटांनी अजनीला पोहोचेल. तर दि. 18 ऑक्टोंबर ते 29 नोव्हेंबर 2023 दरम्यान (7 ट्रिप) दर बुधवारी अजनी येथून सायं. 7 वाजून 50 मिनिटांनी सुटेल आणि दुसर्‍या दिवशी सकाळी 11 वाजून 35 मिनिटांनी पुण्यात पोहोचेल. दरम्यान, ही गाडी दौंड दोरमार्ग, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, शेगाव, अकोला, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा येथे थांबा घेईल.
तसेच, पुणे-गोरखपूर सुपरफास्ट साप्ताहिक विशेष रेल्वेच्या 14 फेर्‍या होणार असून, या गाडीला 22 आयसीएफ कोच असतील. ही विशेष गाडी दि. 20 ऑक्टो. ते 01 डिसेंबर 2023 दरम्यान (7 फेर्‍या) दर शुक्रवारी सायंकाळी 4 वाजून 15 मिनिटांनी पुण्याहून सुटेल आणि दुसर्‍या दिवशी सायंकाळी 09 वाजता गोरखपूरला पोहोचेल. तर गोरखपूर येथून दि. 21 ऑक्टोंबर ते 2 डिसेंबर 2023 दरम्यान (7 फेर्‍या) दर शनिवारी रात्री 11 वाजून 25 मिनिटांनी सुटेल आणि तिसर्‍या दिवशी सकाळी 6 वाजून 25 मिनिटांनी पुण्याला पोहोचेल. दरम्यान ही गाडीदौंड मार्ग लाइन, अहमदनगर, बेलापूर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, खांडवा, इटारसी, भोपाळ, बिना, विरांगना लक्ष्मीबाई जंक्शन, ओरई, कानपूर, लखनौ, गोंडा, मानकापूर, बस्ती आणि खलीलाबाद येथे थांबा घेईल, असे रेल्वे प्रशासनाने सांगितले.
हेही वाचा

Back to top button