Ajit Pawar : प्रारूपरचनेत आवश्यक बाबींचा समावेश करा : उपमुख्यमंत्री

Ajit Pawar : प्रारूपरचनेत आवश्यक बाबींचा समावेश करा : उपमुख्यमंत्री

पुणे; पुढारी वृत्तसेवा : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या नगरविकास रचना आणि प्रारूप विकास योजनेत शहरासाठी आवश्यक सर्व बाबींचा समावेश करा, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पीएमआरडीए प्रशासनाला बैठकीत केल्या आहेत. पुणे महानगर प्रदेश नगरविकास रचना आणि प्रारूप विकास योजनेत शहरासाठी आवश्यक सर्व बाबींचा समावेश करा, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पीएमआरडीए प्रशासनाला बैठकीत केल्या आहेत.

पवार म्हणाले की, आराखड्यात पुरेशा प्रमाणात हरितक्षेत्र आणि पाण्यासाठी लोकसंख्येनुसार आवश्यक नियोजन करण्यात यावे. पीएमआरडीएमध्ये नव्या आकृतिबंधानुसार कर्मचारी भरती करताना पूर्वी काम केलेल्या कंत्राटी कर्मचार्‍यांचा अनुभव लक्षात घेण्याविषयी एमपीएससीला विनंती करण्यात यावी. भौगोलिक रचना लक्षात घेऊन अग्निशमन यंत्रणा उभी करावी, अशा सूचना त्यांनी दिल्या.

महाराणी सईबाई स्मारक आराखड्याबाबत बैठक

महाराणी सईबाई स्मृतिस्थळ स्मारक विकास आराखड्याबाबत बैठक घेण्यात आली. बैठकीला विधानपरिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर, आमदार अतुल बेनके, जिल्हा नियोजन अधिकारी किरण इंदलकर, पुरातत्व विभागाचे सहायक संचालक डॉ. विलास वहाणे उपस्थित होते. उत्खननात आढळलेल्या पुरातनवाड्याचे जतन व संवर्धन करण्यासाठी 25 कोटी रुपये देण्यात येतील. वाड्याची जागा संपादन करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्यात यावी. समाधिस्थळाच्या विकासासाठी आराखडा ऑक्टोबरअखेरपर्यंत सादर करावा. दोन्ही ठिकाणी जोडणार्‍या रस्त्यांचाही आराखड्यात समावेश करावा, असे निर्देश पवार यांनी या वेळी दिले.

प्रगतीतील इमारत कामांचा आढावा

उपमुख्यमंत्री पवार यांनी जिल्ह्यातील प्रगतीतील सारथी कार्यालय, नोंदणी भवन, शिक्षण आयुक्तालय, अप्पर कामगार आयुक्तालय, कृषी भवन, रावेत येथील ईव्हीएम गोदाम या इमारतींसह सैनिकी शाळा सातारा इमारतीच्या कामांचा आढावा घेतला. यासोबत मंजूर झालेल्या प्रादेशिक मनोरुग्णालय, राज्य उत्पादन शुल्क प्रशासकीय इमारत, मोशी येथील फौजदारी न्यायालय इमारत, येरवडा येथील फौजदारी न्यायालय इमारत, ऑलिम्पिक भवन, मध्यवर्ती इमारत नूतनीकरण, उपविभागीय अधिकारी व जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सारथी प्रादेशिक कार्यालय व मुला-मुलींचे वसतिगृह आदी कामांच्या प्रगतीबाबत आणि प्रस्तावित कामांबाबतही या वेळी आढावा घेण्यात आला.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news