Pune University : पुणे विद्यापीठात आज 'इनोव्हेशन डे'चे आयोजन | पुढारी

Pune University : पुणे विद्यापीठात आज 'इनोव्हेशन डे'चे आयोजन

पुणे; पुढारी वृत्तसेवा : माजी राष्ट्रपती आणि शास्त्रज्ञ डॉ. एपीजे अब्दुल कलाम जयंती निमित्त शनिवारी (14 ऑक्टोबर) सावित्रीबाई फुले पुणे विद्यपीठात ‘इनोव्हेशन डे 2023’चे आयोजन करण्यात आले आहे. विद्यापीठाच्या रिसर्च पार्क फाउंडेशनतर्फे आयोजित या कार्यक्रमात विज्ञानातील नवनवीन संकल्पनांवर दिवसभर चर्चा होणार आहे.

या वेळी विज्ञान, तंत्रज्ञान, व्यवसाय या विषयातील तज्ज्ञ आपापल्या क्षेत्रातील ताज्या घडामोडींवर चर्चेतून, सादरीकरणातून प्रकाश टाकतील. तसेच यानिमित्त आयोजित तंत्रज्ञान प्रदर्शनात विज्ञानाचे विविध प्रयोग बघायला मिळणार आहेत. तसेच विज्ञानाची गोडी असलेल्या विद्यार्थ्यांद्वारे करण्यात आलेले विज्ञानाचे नवनवे प्रात्यक्षिकही येथे अनुभवता येणार आहेत. हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले असून, रिसर्च पार्क फाउंडेशनच्या हॉलमध्ये कार्यक्रम होणार आहे.

हेही वाचा

दुर्दशा सर्व्हन्टस सोसायटीची! जमिनीचा मामला, विश्वस्तांचा आपसात हमला..

Pune Navratri 2023 : पुण्यातील देवीच्या मंदिरांमध्ये विधिवत होणार घटस्थापना

छगन भुजबळ यांना पुन्हा धमकीचा फोन

Back to top button