देशाचे नेतृत्व नरेंद्र मोदीच करू शकतात : चंद्रशेखर बावनकुळे | पुढारी

देशाचे नेतृत्व नरेंद्र मोदीच करू शकतात : चंद्रशेखर बावनकुळे

नारायणगाव : पुढारी वृत्तसेवा: गेल्या नऊ वर्षांत देशाचे नेतृत्व कणखरपणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले असून, 2024 ला पंतप्रधान मोदीच पाहिजेत, असा सगळ्यांचा सूर आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीत उद्धव ठाकरे यांनी खंजीर खुपसला. आता ठाकरेंना कोणी विचारीत नाही, तर शरद पवार आता आपला पक्ष कुठे उरलाय का? हे पाहत फिरत आहेत, अशी टीका भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पवार व ठाकरे यांच्यावर केली.शिरूर लोकसभा प्रवास योजनेंतर्गत महाविजय 2024 अंतर्गत ‘घर चलो’ अभियानात बावनकुळे गुरुवारी (दि.12 ) नारायणगाव (ता.जुन्नर) येथे बोलत होते.

संबंधित बातम्या :

उच्च तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, आ. महेश लांडगे, आ. राहुल कुल, माजी मंत्री बाळा भेगडे, सरचिटणीस मुरलीधर मोहोळ, प्रदेश उपाध्यक्ष राजेश पांडे, प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील, जिल्हाध्यक्ष शरद बुट्टे, धर्मेंद्र खाडंरे ,जयश्री पलांडे, ताराचंद कराळे,जुन्नसभा प्रमुख आशाताई बुचके, तालुकाध्यक्ष संतोष खैरे, पुणे जिल्हा सचिव आशीष माळवदकर, ॲड. राजेंद्र कोल्हे शरद दरेकर,अक्षय खैर, अक्षय डोके, अमित औटी, माया डोंगरे, सविता गायकवाड, संगीता वाघ, पंडित मेमाणे, दिलीप गांजाळे, अमोल भुजबळ आदी यावेळी उपस्थित होते.

बावनकुळे यांचे नारायणगाव येथे जोरदार स्वागत करण्यात आले. आदिवासी महिलांचे लेझीम पथक, पारंपरिक वाद्य, आदिवासी तरुण पारंपरिक पेहराव करून मिरवणुकीत सहभागी झाले होते. विश्वकर्मा योजना केंद्राने राबविल्याबद्दल बारा बलुतेदारांनी आपल्या व्यवसायाचे प्रदर्शन मांडले होते. मोदी सरकारने योजना राबविल्याबद्दल समाधान व्यक्त केले. बसस्थानक चौकातील विठाबाई भाऊ नारायणगावकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. बावनकुळे यांनी या वेळी पायी चालत नागरिकांशी व दुकानदारांशी संवाद साधला. नारायणगावच्या पूर्व वेशीवरील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला.

उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना बावनकुळे म्हणाले, त्यांनी स्वार्थासाठी हिंदुत्व सोडले आणि कामातूनच गेले. शरद पवार यांच्यासोबत जाऊन मुलाला मंत्री केले. आता मोदींच्या विरोधात सगळे विरोधी पक्ष एकत्र आणून गरळ ओकत आहेत. जनता त्यांना थारा देणार नाही. शेतकरी, कामगार, सामान्य जनता यांच्याशी आमचं सरकार कटिबद्ध आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आशिष माळवदकर यांनी केले, तर शरद दरेकर यांनी आभार मानले.

Back to top button