FTII News : एफटीआयआयच्या नियामक मंडळाची पुनर्रचना कधी? | पुढारी

FTII News : एफटीआयआयच्या नियामक मंडळाची पुनर्रचना कधी?

पुणे; पुढारी वृत्तसेवा : एफटीआयआयच्या नियामक मंडळाची २०२० पासून पुनर्रचना झालेली नाही. यासह धोरण ठरवणे आणि निर्णयप्रक्रिया यातून माजी विद्यार्थ्यांमधील चार सदस्य, तसेच चित्रपट, दूरदर्शन आणि नाट्य क्षेत्रातील आठ सदस्यांना वगळण्यात आले आहे, असे विविध प्रश्न एफटीआयआय स्टुडंट‌्स असोसिएशनने एफटीआयआयचे अध्यक्ष आर. माधवन यांच्याकडे मांडले. तसेच, विविध प्रश्नांकडे आर. माधवन यांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न असोसिएशनच्या विद्यार्थी प्रतिनिधींनी केला. शैक्षणिक परिषदेतून विभाग प्रमुख आणि विद्यार्थ्यांचे प्रतिनिधित्व कमी करण्यात आले आहे, असेही असोसिएशनकडून सांगण्यात आले.

केंद्र सरकारने १ सप्टेंबर रोजी एफटीआयआयच्या अध्यक्षपदी आर. माधवन यांची नियुक्ती केली. आर. माधवन यांनी दोन दिवसांपूर्वी एफटीआयआयमध्ये येऊन अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला. त्यांच्या दोन दिवसांच्या भेटीत त्यांची एफटीआयआय स्टुडंट्स असोसिएशनच्या विद्यार्थी प्रतिनिधींशी बैठक झाली. त्या वेळी विद्यार्थी प्रतिनिधींनी विविध प्रश्न आर. माधवन यांच्याकडे मांडले. सोसायटीच्या पुनर्रचनेसाठी आवश्यक ती पावले उचलली जात आहेत. सोसायटी आणि त्यातून नियामक मंडळाची पुनर्रचना केली जाईल.

संस्थेला लवकरच पूर्णवेळ संचालक नेमले जातील, असे प्रशासनातर्फे सांगण्यात येत आहे. २०२० मध्ये शेखर कपूर अध्यक्ष झाल्यानंतर सरकारकडून या रचनेला खीळ बसली. कपूर यांचा कार्यकाळ संपल्यानंतर सहा महिन्यांनी एफटीआयआयला नवीन अध्यक्ष मिळाला, तरी सरकारने या रचनेकडे लक्ष दिलेले नाही. शैक्षणिक परिषदेतही विद्यार्थ्यांचा सहभाग आणि त्यांच्या मतांना स्थान नसल्याने कलेच्या संस्थेचे काम केवळ प्रशासकीय पातळीवर सुरू आहे. त्यावर असोसिएशनकडून लक्ष वेधण्यात आले.

  • असोसिएशनने मांडलेले प्रश्न
  • एफटीआयआयला इन्स्टिट्यूट ऑफ नॅशनल इम्पॉर्टन्स स्टेटस मिळावे.
  • कर्मचाऱ्यांच्या वेतन, स्टुडिओच्या कामाला लागत असलेला वेळ
  • ऑनलाईन प्रवेशप्रक्रियेत येणाऱ्या समस्या
  • राज्य शिष्यवृत्ती मिळण्यातील विविध अडचणी;

दोन तास साधला संवाद

पायाभूत सुविधांसह शैक्षणिक प्रश्नांबाबत आर. माधवन यांच्याशी संवाद साधला. त्यांनी आमचे प्रश्न खूप चांगल्या पद्धतीने समजून घेतले आणि त्यावर चर्चाही केली. दोन तास त्यांनी आमच्याशी संवाद साधला. एफटीआयआयमधील विविध गोष्टींमध्ये कायम सहभाग असावा, त्यांनी कॅम्पसमध्ये भेट देत विद्यार्थ्यांचे प्रश्न समजून घेऊन ते सोडवावेत, असे विविध मुद्देही मांडले. त्यांनी आमचे म्हणणे ऐकून घेतले. तसेच, प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासनही दिले असल्याचे एफटीआयआय स्टुडंट्स असोसिएशनकडून सांगण्यात

हेही वाचा 

Rankala Lake : रंकाळा तलावाला ‘क्वीन्स नेकलेस’ रोषणाई

क्राईम : लोभ श्रीमंतीचे, नुकसान आयुष्याचे

मुंबई, पुणे, नागपूर शहरांतून मान्सूनची माघार

Back to top button