Pune News : बारामती परिसराला ऑक्टोबर हिटचा तडाखा

Pune News : बारामती परिसराला ऑक्टोबर हिटचा तडाखा

बारामती : पुढारी वृत्तसेवा :  गेल्या चार दिवसांपासून बारामती तालुक्यात पावसाने पुन्हा दडी दिल्यामुळे उन्हाचा चटका वाढला आहे. ऐन पावसाळ्यात बारामतीकर उकाड्याने हैराण झाले असून, पुन्हा एसी आणि फॅनची आवश्यकता भासू लागली आहे.सकाळच्या सत्रात उन्हाचा पारा वाढला आहे. सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात बारामती तालुक्यात सर्वदूर पाऊस झाला. रविवारी (दि. 1) पावसाने हजेरी लावली होती. मात्र, पुन्हा पाऊस गायब झाला झाल्याने तालुक्यातील जनता वाढलेल्या उन्हाने त्रस्त झाली आहे. चालू वर्षी बारामती तालुक्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. आतापर्यंत झालेल्या पावसाने शेतीसह जनावरांच्या पाण्याचा प्रश्न काही प्रमाणात सुटला असला तरीही शेतकरी अजूनही पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.

संबंधित बातम्या :

वास्तविक पाऊस सुरू होताच एसी, फॅन, कुलर बंद केले जातात. मात्र, उकड्यापासून संरक्षण व्हावे यासाठी नागरिकांनी पुन्हा थंडावा देणार्‍या उपकरणांचा आधार घेतला आहे. दिवसभर प्रचंड ऊन, रात्री काहीशी थंडी, तर पहाटे धुके पडत आहे. उन्हापासून बचाव व्हावा यासाठी गॉगल, टोपी, छत्री, स्कार्फ याचा वापर होऊ लागला आहे. शेतकरी सकाळच्या सत्रातच शेतातील कामे उरकून घेत असून, उन्हापासून संरक्षण व्हावे यासाठी उपाययोजना करत आहेत.

नवरात्रोत्सवात सरासरी एवढा पाऊस व्हावा
जून, जुलै,ऑगस्ट महिना तालुक्यात कोरडा गेला. सप्टेंबर महिन्यात एक, दोन मोठे पाऊस झाले. त्याने काही प्रमाणात आधार मिळाला. परंतु वर्षाची तहान भागावी तसेच सप्टेंबर कोरडा गेल्याने येणार्‍या नवरात्र उत्सवात तालुक्यात सरासरी एवढा पाऊस पडावा, अशी अपेक्षा बळीराजा व्यक्त करीत आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news