Pune news : कुरकुंभ आणि पांढरेवाडी हद्दीत बनावट देशी दारू जप्त | पुढारी

Pune news : कुरकुंभ आणि पांढरेवाडी हद्दीत बनावट देशी दारू जप्त

कुरकुंभ : पुढारी वृत्तसेवा :  दौंड तालुक्यातील कुरकुंभ आणि पांढरेवाडी हद्दीत बनावट देशी दारूची वाहतुक व विक्री करताना धडक कारवाई करण्यात आली. या कारवाईत २० बाॅक्स बनावट देशी दारूसह चारचाकी, दुचाकी असा एकूण ७ लाख ७३ हजार २०० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभाग दौंड तसेच निरीक्षक भरारी पथक क्रमांक २ पुणे यांनी सापळा रचून वरील कारवाई केली आहे. याप्रकरणी दौंड शहरातील दोनजणांसह तिघांना अटक केली आहे. यादरम्यान अणखी एकजण फरार झाला असून तोही दौंडमधील आहे.

संबंधित बातम्या :

सोनू विसराम कलोशिया (वय २२, रा. रामनगर बोपखेल, ता. हवेली), शहारूख दाउद सय्यद (वय २६ ,रा. बंबचाळ जे. १८३ दौंड, ता. दौंड), अभिजीत धनंजय लोणकर (वय ३०, रा. पासलकरवस्ती दौंड, ता. दौंड) अशी अटक केलेल्यांची नावे आहे. अनिकेत प्रकाश भोसले (वय २६, रा. बांबचाळ शालीमार चौक दौड) हा घटनास्थळावरून फरार झाला आहे.

राज्य उत्पादन शुल्क निभागाचे आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी, संचालक सुनिल चव्हाण, पुणे विभागाचे उपायुक्त मोहन वर्धे, पुणे जिल्ह्याचे अधिक्षक चरणसिंग राजपुत, उपअधिक्षक एस. आर. पाटील, युवराज शिंदे, संतोष जगदाळे यांचे मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत राज्य उत्पादन शुल्क विभाग दौंडचे निरीक्षक विजय रोकडे, भरारी पथक क्रमांक २ चे दुय्यम निरीक्षक अशोक शितोळे, निरीक्षक नेवसे, माजरे, भोसले, सहायक दुय्यम निरीक्षक दत्ता गवारी व जवान सर्वस्वी, किशन पावडे, अशोक पाटील, गणेश वावळे, प्रविण चव्हाण, अक्षय म्हेत्रे, सागर दुबळे, नवनाथ पडवळ, रोहित शिंदे (होमगार्ड) यांचा समावेश होता. पुढील तपास निरीक्षक विजय रोकडे करीत आहेत.

Back to top button