पोलिस उपमुख्यालयाच्या कामांसाठी लवकरच निधी : उपमुख्यमंत्री अजित पवार | पुढारी

पोलिस उपमुख्यालयाच्या कामांसाठी लवकरच निधी : उपमुख्यमंत्री अजित पवार

बारामती : पुढारी वृत्तसेवा : बारामतीनजीक बर्‍हाणपूर येथील पोलिस उपमुख्यालयातील टप्पा क्रमांक दोनच्या कामासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. सोमवारी (दि. 2) पवार यांनी येथील बांधकामाची पाहणी केली. त्या वेळी ते बोलत होते.

राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. दिलीप पाटील-भुजबळ, पोलिस अधीक्षक अंकित गोयल, पुणे वन विभागाचे उपवनसंरक्षक महादेव मोहिते, अपर पोलिस अधीक्षक आनंद भोईटे आदी याप्रसंगी उपस्थित होते.  वन्यजीव सप्ताहाचे औचित्य साधून उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते पोलिस उपमुख्यालय बर्‍हाणपूर येथील परिसरात तसेच कन्हेरी वन उद्यान येथे वृक्षारोपण करण्यात आले.

Back to top button