

पुणे : कोथरूड येथील दुचाकी चोरताना पकडलेल्या तीन दहशतवाद्यांपैकी एक इसिसचा बंदी असलेल्या अलसुफा संघटनेचा दहशतवादी कोंढव्यातून फरार झाला होता. त्याला दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने दिल्ली येथून बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्यावर एनआयएने तीन लाखांचे बक्षीस जाहीर केले होते. पोलिस तपासाला गेल्यानंतर कोंढवा परिसरात तो राहत असलेल्या घराची झाडाझडती घेत असताना तो पळून गेला होता.(Terrorist Shahnawaz)
शहानवाज ऊर्फ शफी उझ्मा असे फरार झालेल्या दहशतवाद्याचे नाव आहे. शहानवाजबरोबर तलाह लियाकत खान, रिजवान अब्दुल हाजी अली आणि अब्दुला फैयाज शेख ऊर्फ डायपरवाला यांच्यावर देखील एनआयएने तीन लाखांचे बक्षीस जाहीर केले आहे. शहानवाज याने 18 जुलै रोजी पळ काढला होता. तो तब्बल 70 हून अधिक दिवस तपास यंत्रणांना चकवा देत होता. मधल्या काळात तो कोणाला भेटला, त्याने दहशतवादी कृत्याच्या दृष्टीने काही हालचाली केल्या आहेत का? या दृष्टीनेदेखील तपास यंत्रणांकडून सध्या तपास सुरू आहे.
तत्पूर्वी पुण्यातून अटक करण्यात आलेले शहानवाजचे साथीदार मोहम्मद युनूस साकी आणि इम्रान खान ऊर्फ युसूफ यांच्याकडील आतापर्यंत केलेल्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यांनी पुण्यात दोनदा बॉम्ब बनविण्याचे प्रशिक्षण दिले असल्याची माहिती एनआयएने राजस्थान येथील गुन्ह्यात दोघांना अटक केल्यानंतर न्यायालयात समोर आली होती. त्यातच बॉम्ब बनविण्याचे प्रशिक्षण मुख्य आरोपी असलेल्या इम्रान खान याच्या पोल्ट्री फार्मवर मिळाल्याचाही खळबळजनक प्रकार उघड झाला आहे. एनआयएने आतापर्यंत केलेल्या तपासात मोहम्मद साकी आणि इम्रान खान हे इसिसची विचारधारा पसरविण्यासाठी महाराष्ट्रात सक्रिय झाले असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. फरार झाल्यापासून विविध तपास यंत्रणा शहानवाज याच्या मागावर होत्या.
गस्तीवर असणार्या पोलिसांचे पथक त्यांच्या नजरेस पडेल त्याला बरोबर हेरतात. असाच काहीसा प्रसंग दोन महिन्यांपूर्वी रात्रीच्या पेट्रोलिंगदरम्यान कोथरूड परिसरात दुचाकी चोरणार्या तिघांना पोलिसांनी हटकले. सुरुवातीला त्या तरुणांनी आयटीमध्ये आहोत, असे सांगत हुलकावणी देण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांच्या नजरेने इतर प्रश्नांमध्ये त्यांना अडकवले. तिघांना ताब्यात घेऊन पोलिसांचे पथक कोंढवा परिसरातील त्यांच्या घराची झाडाझडती घेण्यासाठी घुसले. अन् इथेच बॉम्ब बनविण्याचा मोठा कट उघड झाला. याच वेळी शहानवाज पोलिसांच्या हातातून निसटला होता.
दहशतवाद्यांच्या घरातून सापडले ड्रोनचे साहित्य, स्फोटकाच्या गोळ्या
पुण्यात दहशतवाद्यांचे प्रशिक्षण झाल्याचे आले समोर
रेकी करताना कोणत्याही हॉटेलचे बुकिंग नाही
पुण्यासह राज्यातील विविध जंगलांची ड्रोनद्वारे पाहणी
जंगलात वास्तव्य करून बॉम्बस्फोटाची चाचणी
'इसिस'चा प्रसार करणार्या उच्चशिक्षितांसह अनेक जणांना अटक
'इसिस'च्या संपर्कात आलेल्या डॉक्टरलाही अटक
आर्थिक रसद पुरविणारे, भाडेतत्त्वावर जागा देणारेही अटकेत
पुणे पोलिसांनंतर महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथक (एटीएस)
सध्या एनआयएकडून तपास
'इसिस'च्या पुणे मोड्यूलशी संबंधित 5 दहशतवाद्यांवर 5 लाखांचे बक्षीस
हेही वाचा