पुणे; पुढारी वृत्तसेवा : मोहम्मद पैगंबर जयंतीनिमीत्त रविवारी शहरातीत वाहतुकीत तात्पुरता बदल करण्यात आला आहे. मिरवणुकीदरम्यान वाहतुकीची कोंडी होऊ नये, वाहतूक सुरक्षित व सुरळीतपणे राहावी, यासाठी वाहतूक शाखेचे उपायुक्त विजयकुमार मगर यांच्या आदेशाने काही मार्गावरील वाहतुकीमध्ये बदल करण्यात आला आहे. या वेळी नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
मनुशाह मशिद, 482 नाना पेठ पुणे येथून मुख्य मिरवणुकीस सुरुवात होईल. ती मिरवणूक संत कबीर चौकामार्गे भगवानदास चाळ, चुडामन तालीम चौक, शिवाजी मार्केट ते सेंट्रल स्ट्रीट रोडने भोपळे – चौक गाव कसाब मशिद समोरून मुक्ती फौज चौक ते पुलगेट चौक, डावीकडे महात्मा गांधी रोडने (15 ऑगस्ट चौक) महंमद रफी चौक, कोहिनूर हॉटेल चौक, महावीर चौक- डावीकडे वळून साचापीर स्ट्रीटने महात्मा फुले – चौक संत कबीर चौक, नानाचावडी चौक, अल्पना सिनेमा ते हमजेखान चौक डावीकडे वळून सुभानशहा दर्गा चौक, सिटीजामा मशिद शुक्रवार पेठ याठिकाणी मिरवणुकीची सांगता होणार आहे.
या मिरवणूक मार्गावर व या मार्गाला मिळणारे उप रस्ते व गल्ल्यांचे तोंडापासून आतील बाजूस 100 मीटर अंतरापर्यंत सर्व प्रकारची वाहने उभी करण्यास बंदी करण्यात आली आहे. तसेच, मिरवणुकीचे मुख्य मार्गावर रस्त्याचे दोन्ही बाजूस सर्व प्रकारची वाहने उभी करण्यास मिरवणूक वेळेच्या कालावधीपुरती बंदी घातली आहे.
मिरवणूक सुरू होताना रास्ता पेठ पॉवर हाऊस ते संत कबीर चौक अशी जाणारी वाहतूक रास्ता पेठ, समर्थ पोलिस स्टेशन क्वॉर्टरगेट मार्गे सोडण्यात येईल. मिरवणूक संत कबीर चौकात आल्यानंतर वाहने सायकल कॉलनी, डावीकडे वळून समर्थ पोलिस स्टेशन पुढे रास्ता पेठ, पॉवर हाऊस, के.ई.एम. हॉस्पिटल, अपोलो सिनेमा मार्गे सोडण्यात येतील. मिरवणूक संत कबीर चौकात असेपर्यंत नाना पेठेतून लक्ष्मी रोडने येणारी वाहने नाना चावडी चौकातून वळवण्यात येतील. ती वाहने रास्ता पेठ पॉवर हाऊसमार्गे इच्छितस्थळी जातील. मिरवणूक पद्मजी पोलिस चौकी चौकात आल्यानंतर क्वॉर्टरगेटकडून त्या दिशेला वाहने न सोडता ती संतकबीर चौक मार्गे वळवण्यात येतील.
आसूडखाना चौक ते होले रोडने नवीन तालीम चौक, गोपी चौक, टांगा स्टॅण्ड चौक, क्राऊन हॉटेल, टीकाराम चौक, डी. आर. गांधी चौक, महाराष्ट्र बँक चौक- शिवाजी पुतळा चौक जामा मशिद खडकी बाजार येथे विसर्जन. या मिरवणूक मार्गावरील वाहतूक गरजेनुसार अल्पकालावधीसाठी बंद अथवा वळवण्यात येणार आहे. तसेच मिरवणूक पुढे सरकताच पाठीमागील वाहतूक पूर्ववत करण्यात येईल. तरी नागरिकांनी व वाहनचालकांनी वरील नमूद मार्गांवर येण्याचे टाळावे, मिरवणूक मार्गावर वाहने पार्क करू नयेत. तसेच पर्यायी मार्गांचा वापर करून पोलिसांना सहकार्य करावे.
हेही वाचा